वणी जत्रा मैदानात जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांचा छापा – दोघांना अटक, रोख मुद्देमाल जप्त.
वणी (जि. यवतमाळ) – दिपक चौपाटी येथील जत्रा मैदानात पोलिसांनी 20 जुलै 2025 रोजी संध्याकाळी सुमारास अचानक धाड टाकून जुगार खेळत असलेल्या दोघांना रंगेहाथ पकडले. उर्वरित आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब बापुराव उपरे (वय 40, रा. लाठी, ता. वणी) आणि प्रविन सुर्यभान गेडाम (वय 36, रा. पुरड, ता. वणी) हे दोघे जत्रा मैदानात खुलेआम जुगार खेळताना आढळून आले.
घटनास्थळी पांढऱ्या रंगाचा चार्ट, ज्यावर लाल रंगात 1 ते 10 आकडे, तसेच प्लास्टिकचे पत्ते ज्यावर लाल व काळ्या रंगात आकडे लिहिलेले होते, असा जुगाराचा साहित्य पोलिसांना आढळला. आरोपी क्र.1 जवळ 2,000 रुपये, तर आरोपी क्र.2 जवळ 2,670 रुपये अशी एकूण 4,670 रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
ही कारवाई पो.कॉ. 2722 राजकुमार देविचंद राठोड यांच्या फिर्यादीवरून कलम 12(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत करण्यात आली. या प्रकरणाचा तपास NPC/2308 सावसागडे करत असून, ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक उंबरकर साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.