दि. 1 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वणी शहरातील स्वस्तिक लेआउट परिसरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरीचा प्रयत्न केला.
स्वस्तिक लेआउटमधील रहिवासी श्री. घनश्याम इंगोले यांच्या घराच्या पोर्चमध्ये ठेवलेल्या दोन मोटारसायकल चोरट्यांनी गेटची कुलूप–कोंडी तोडून बाहेर काढल्या. परंतु दोन्ही वाहनांच्या टँकमध्ये पेट्रोल नसल्याने चोरट्यांना गाड्या सुरू करता आल्या नाहीत. परिणामी त्यांनी दोन्ही मोटारसायकलकाही अंतरावर (100 ते 150 मीटर) टाकून दिल्या.
त्यांच्या गाड्यांचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :
1. MH34 DJ 3828
2. MH34 X 8430
याचदरम्यान, शेजारच्या पाटील लेआउटमध्ये राहणारे श्री. वाबिटकर यांच्या घराजवळून मात्र चोरट्यांनी
MH29-AS-572 ही मोटारसायकल चोरून नेली. याबाबत संबंधितांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात रात्री उशिरापर्यंत बाहेर बसून दारू पिणाऱ्यांची संख्या वाढलीआहे. परिणामी चोरीसारख्या घटना घडत असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे,
या घटनांमुळे येथील ज्येष्ठ नागरिकांनी सकाळ–संध्याकाळी फिरणे बंद केले असल्याचे सांगितले जात आहे.
याच परिसरात काही दिवसांपूर्वी एका भंगार जमा करणाऱ्या एका वृद्धाचा खून करण्यात आला होता व आता दुचाकी चोरीची घटना यामुळे परिसरातील नागरिक धास्तावले आहेत…
या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी व परिसरात शिस्त राखावी, अशी मागणी केली आहे.
पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की चोरट्यांवर पोलिसांचा वचक राहिला नाही…