मारेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर (वय ५७) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी छातीत अस्वस्थता जाणवल्या नंतर त्यांना वणी येथील लोढा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांच्या निधनाची बातमी कळताच वणी,मारेगाव,मुकुटबन, शिरपूर येथील पोलिस कर्मचारी लोढा हॉस्पिटलमध्ये पोहचले…
बेसरकर यांचे कुटुंबीय सध्या नागपूरला असून ते वणीला पोहचल्यावर पुढील कार्यक्रम ठरवला जाईल…
गेल्या वर्षी त्यांची बदली पुसद येथून मारेगावला झाली होती. शांत, मनमिळावू स्वभाव, नागरिकांशी जिव्हाळ्याने वागण्याची शैली आणि कर्तव्यनिष्ठ वृत्ती यामुळे त्यांनी अल्पावधीतच लोकांच्या मनात स्थान मिळवले.
त्यांच्या आकस्मिक जाण्याने पोलिस दलासह मारेगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.
उमेश बेसरकर यांच्या पश्चात पत्नी व मुले असा परिवार असून त्यांच्या जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सिटी हब मिडिया तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…