वणीतील नामवंत सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक, आणि निस्वार्थ सेवाभावी, पर्यावरणवादी दिलीप कोरपेनवार सर (वय 57 वर्ष) चिमूर वरोरा मार्गावर आनंदवन जवळ परसोडा फाट्यावर ट्रकने त्यांच्या मालवाहू गाडीला धडक दिल्याने गंभीर जखमी झाले होते ही घटना पहाटे 4.30 वाजता घडली त्यांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींही गंभीर जखमी झाले
यानंतर वणीत शोककळा पसरली असून अनेकांनी रविनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली…कोरपेनवार सर नप शाळा क्रमांक 8 मध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते,ते विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमाने घडवत होते.शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे त्यांनी वणीतील कानाकोपऱ्यात झाड लावण्याचा उपक्रम सुरू करून ती झाडें जगवली ही,आज वणीतील प्रत्येक रस्त्याच्या कडेला त्यांनी लावलेली झाडे डौलाने उभी आहेत.
विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा सोबतच त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी ही घेतली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,भाऊ व मोठा असा सामाजिक परिवार आहे.
त्यांच्या निधनाने वणीतील एक सच्चा सेवाभावी कार्यकर्ता हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सिटी हब मिडिया तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…