पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावरून युवकाने घेतली नदीत उडी…
आज २७ ऑगस्टला दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास वणी येथील एका २३ वर्षीय युवकाने पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावरून नदीत उडी मारल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे…
सदर युवकाचे नाव प्रणय संजय गोखरे असून तो जैन ले आउट येथे राहत असल्याची माहिती आहे…
त्याने उडी मारल्याची घटना महामार्गावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असल्याने या घटनेचा उलगडा झाला,तसेच पुलाजवळ युवकाची बाईक ही आढळली आहे…
घटनेची माहिती वणी पोलिस स्टेशनला मिळतात तातडीने पोलिस निरीक्षक गोपाळ उंबरकर घटनास्थळी दाखल झाले असून युवकाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ च्या टीमला पाचारण करण्यात आले आहे…
अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल…