आजही जगात प्रामाणिकपणा कायम आहे,पोलिस स्टेशन तर्फे प्रामाणिकपणाचे कौतुक…
त पोळा यात्रेनिमित्त वणी येथील शासकीय मैदानावर झालेल्या गर्दीत एका हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन तो त्याच्या मालकाकडे परत सुपूर्द करण्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
दिनांक २३ ऑगस्ट रोजी झालेल्या यात्रेत पंचशील नगर वणी येथील सी. राखी रामेश्वर कांबळे यांना एक मोबाईल फोन जमिनीवर पडलेला आढळून आला. सदर मोबाईल हरवलेला असल्याचे लक्षात येताच त्यांनी कोणताही मोह न बाळगता तो मोबाईल थेट वणी पोलिस स्टेशनमध्ये जमा केला. पण मोबाईल पॅटर्न लॉक असल्याने तो उघडणे शक्य झाले नाही तसेच मोबाईल वर कुणाचा कॉल सुद्धा येत नव्हता त्यामुळे हा मोबाईल नेमका कुणाचा आहे हे कळत नव्हते पण रात्री नऊच्या सुमारास मोबाईल वर एका महिलेचा कॉल आला व तिने आपले नाव पूजा संकेत मेश्राम असे सांगितले तो मोबाईल स्वतः चा असल्याची माहिती दिली तसेच मालकी हक्काचे पुरावे ही पोलिसांना दिले…
व दुसऱ्या दिवशी महिलेच्या पतीने संकेत मेश्राम यांनी पोलिस स्टेशनला येऊन तो मोबाईल परत घेतला आणि राखी मेश्राम तसेच वणी पोलिसांचे आभार मानले…
या जगात आजही प्रामाणिकपणा कायम आहे हे या घटनेने सिद्ध झाले…
“गर्दीच्या कार्यक्रमामध्ये अशा घटना अनेकदा घडतात, परंतु राखी रामेश्वर कांबळे यांनी दाखवलेली प्रामाणिकता समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी आहे.”
हरवलेला मोबाईल सुखरूप परत मिळाल्याने पूजा संकेत मेश्राम यांनी आनंद व्यक्त करताना पोलिस प्रशासन तसेच राखी रमेश्वर कांबळे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत…
ही घटना प्रामाणिकतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा उत्तम आदर्श ठरली आहे…