वणी : शहरातील बसस्टँड परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना वणी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत गजाआड केले. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
दिनांक ३ सप्टेंबर रोजी वणी बसस्टँडवर फिर्यादी राहुल कुभेकार राजूर कॉलरी (वय ५५) व बजरंग परबत रा.निजामपूर ता.रिसोड जि.वाशिम (वय ३२) हे दोघे वणी वणी स्थानकावरून चंद्रपूर ला जाण्यासाठी निघाले होते या दरम्यान बस मध्ये चढताना या दोघांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. फिर्यादींनी त्वरित वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला असता, दिपक चौपाटीवरून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे समीर साबीर पठाण (वय १९)आणि अर्जुन गोपाल आडे (वय ३०) (दोन्ही राहणार रंगनाथ नगर )अशी आहेत. आरोपींकडून चोरीस गेलेले दोन मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. यात एक Xiaomi आणि एक Vivo कंपनीचा मोबाईल आहे.
चोरीच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासांतच वणी पोलिसांच्या तडकाफडकी कारवाई ने मोबाईल धारकांना दिलासा मिळाला आहे…
सदर दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गुल्हाने, तसेच पोलीस पथकातील शिराज शेख, मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, गजानन कुडमेथे यांनी महत्वाची भूमिका बजावली.