वणी पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली भद्रावती येथील सध्या वास्तव्य (वागदरा )
आशिष संजय कटोते वय २१ याला अटक केली असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे…
सविस्तर माहिती अशी की
वणी–चारगाव चौकी मार्गावरील मंदर शिवारात मांडवकर बिअरबारच्या मागे १८ ऑगस्ट रोजी विवस्त्र अवस्थेत आढळलेला मृतदेह पाहून परिसरात खळबळ उडाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आणि गंभीर जखमा झालेला हा इसम नेमका कोण, व त्याचा खून कोणी केला, याचा शोध घेणं पोलिसां समोर मोठं आव्हान होतं,
मृतकाची ओळख देवराव दत्तू गुंजेकर (५६, रा. नवीन लालगुडा, वणी) अशी झाली. तो भंगार गोळा करून उपजीविका करीत होता. दारूचे व्यसन आणि अस्थिर राहणीमान यामुळे तो वारंवार घरमालकांकडून हाकलला जात असे. पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना त्याचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता.
पोलिसांनी विविध युक्त्या वापरून तपासाला सुरुवात केली पण यश मिळत नव्हते पण अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून पहिले सीसीटीव्ही मध्ये दिसलेली दुचाकी क्रं (MH12-PX4611)चा शोध घेतला व ही दुचाकी लालगुडा चौकावर पकडल्या गेली व घटनेचा एक एक धागा उलगडत गेला,
तपासा दरम्यान पोलिसांना समजले की मृतकाचा काही दिवसांपूर्वी आशिष संजय कटोते (२१, रा. वागदरा) या तरुणाशी वाद झाला होता. गुंजेकर याने कटोते याच्याकडील मोबाईल आणि पैसे हिसकावले होते. याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने त्याला दारू पाजून दुचाकीवरून गौरी ले–आऊट परिसरात नेले आणि दगडाने ठेचून खून केला.
या तपासात सीसीटीव्ही फुटेजने महत्त्वाची भूमिका बजावली. फुटेजमध्ये दुचाकी दिसली पण चेहरा अस्पष्ट होता. पोलिसांनी प्रथम दुचाकीचा मालक शोधून त्याची चौकशी केली. त्यातून आशिष कटोते याचे नाव समोर आले. त्यानंतर मोबाईल लोकेशन तपासून २६ ऑगस्टला नांदेपेरा रोड परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे आता या खुनामागेआणखी कुणी सहभागी होते का, याचा शोध घेण्यासाठी पोलिस चौकशी करत आहेत.
पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ उंबरकर करत असून ही कारवाई पोलीसअधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सतिश चवरे (स्थानिक गुन्हे शाखा), पो.नि. गोपाल उंबरकर (पो.स्टे. वणी),
उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, गजानन राजमुल्लु, धनराज हाके यांच्यासह पोलीस अंमलदार सय्यद साजिद, सुनील खंडागळे, रुपेश पाली, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, सलमानशेख, सुनील पैठणे, आकाश सूर्यवंशी, नरेश राऊत, सतीश फुके, पठाण, धीरज गुल्हाणे आणि डिबी पथक वणी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
या संयुक्त कारवाईमुळे प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून पोलिसांचे प्रयत्न नागरिकांकडून कौतुकास्पद ठरत आहेत. 🚔