जैन ले आउट येथील प्रणय संजय गोखरे वय (२३) याने बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी पाटाळा येथील पुलावरून वर्धा उडी मारली होती ही घटना पुलावरच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली तसेच त्याची मोपेड ही पुलाजवळ आढळली होती व नदीचा प्रवाह वेगात असल्याने प्रणयचा शेवटी मृतदेहच हाती आला,९ किलोमीटर अंतरावर बेलोरा गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात
प्रणयचा मृतदेह नदीवर गावकऱ्यांना तरंगताना दिसून आला ,दोन दिवसांपासून बचाव दलाची शोधमोहीम सुरू होती परंतु शेवट अतिशय दुःखद झाला…
उच्चशिक्षित युवकाच्या अश्या करूण अंताने वणीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतदेह मिळाल्यावर प्रणयच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले असून ओळख पटल्यावर उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात येईल…
पोलीस विभागाने पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे…