लोकमान्य टिळक महाविद्यालयात युवाशक्ती व्याख्यानमालेचे आयोजन
वणी येथे ‘युवाशक्ती व्याख्यानमाला’ – राष्ट्रनिर्माणासाठी तरुणांना आवाहन,
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त लोकराज्याच्या विकासात युवाशक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी तर्फे ‘युवाशक्ती व्याख्यानमाला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेचा विषय ‘राष्ट्रनिर्माण आणि युवाशक्ती’ असा असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. विजयराव मुकेवार (अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, वणी) भूषवणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा मा. प्रा. वसंतराव पुरके उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. नरेशजी बऱडिया (उपाध्यक्ष), मा. श्री. सुभाषराव देशमुख (सचिव) व मा. श्री. अशोकराव सोनटक्के (सहसचिव) उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक मान्यवर व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती विशेष उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.
हा कार्यक्रम दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता, लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार असून, सर्व नागरिक व विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊन व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभाग, लो. टि. महाविद्यालय, वणी यांनी केले आहे.
“इथे नांदते अस्मिता भारताची, इथे नित्य सन्मान हो भारताचा” या ब्रीदवाक्यासह व्याख्यानमालेद्वारे समाजात राष्ट्रप्रेम, क्रीडाभावना आणि युवाशक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न होणार आहे.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य प्रसाद खानझोडे
आणि संयोजक प्रा.उमेश व्यास यांनी केले आहे…