वणी शहरात अवैध दारू तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. स्थानिक पोलिसांनी सतीघाट चिखलगावरोडवर छापा मारत दोन दारू तस्करांना रंगेहाथ पकडलं असून, तब्बल ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तकेला आहे.
स्विफ्ट डिझायर गाडीतून दारूचा साठा
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, MH 49 B 5093 या क्रमांकाच्या निळ्या स्विफ्ट डिझायरकारची झडती घेतली असता, २८ खोक्यांत भरलेल्या २८०० देशी दारूच्या बाटल्या (९० एमएल) आढळून आल्या. या बाटल्यांची किंमत १.१२ लाख रुपये असून, वाहतूक करत असलेली गाडी देखील ४ लाख किंमतीची असल्यानेसंपूर्ण मुद्देमालाची एकूण रक्कम ५.१२ लाख रुपये आहे.
पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे:
खुशाल शंकर चहारे (३७), रा. गुरूनगर, वणी
शाम संभाजी दुर्ग (३९), रा. दामले फैल, वणी
या दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) व ६५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई पो.ह. नितीन गेडाम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल श्यामराठोड, गजानन कुडमेथे व शंकर चौधरी यांची साथ होती. ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारीगणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी अधिकारी स.पो.नी. प्रियंका चौधरी यांच्या आदेशावरून पारपडली.
पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन गेडाम करीत आहेत.
आता प्रश्न हा आहे की अवैध धंद्याविरोधात वणी पोलिस तत्काळ कारवाई करताना दिसत आहे परंतु हीच वणीपोलिस वारंवार होणाऱ्या घरफोड्यांचे सत्र थांबवण्यात अपयशी का ठरत आहे??? नागरिकांची अपेक्षा आहे कीपोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना ही जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा…