30 जुलै 2025 ला वणी विधानसभा भारतीय जनता पक्षाच्या वतीने व दुर्गामाता देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने, भाजपा नेते आणि राज्याचे माजी मंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गामाता मंदिर, आंबेडकर चौक येथे भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले…
या धार्मिक आणि उत्साही वातावरणातील कार्यक्रमात वणी विधानसभेचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ज्येष्ठ किसान नेते विजय पिदूरकर, माजी पंचायत समिती अध्यक्ष संजय पिंपळशेडे, भाजपा महामंत्री रवी बेलूरकर, सरचिटणीस संतोष डंभारे, समाजसेवक मुन्ना महाराज तुगनायत, अॅड. प्रवीण पाठक, आशिष डंभारे, नगरसेवक विजय मेश्राम, नगरसेविका प्रीती बिडकर, महिला नेत्या आरती वांढरे, नितीन बिहारी, प्रणव पिंपळे, लवली लाल यांसह दुर्गामाता मंदिर नियोजन समितीचे सर्व सदस्य व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाआरती दरम्यान संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता, उपस्थितांनी सुधीरभाऊंच्या दीर्घायुष्य व यशस्वी आरोग्यासाठी प्रार्थना केली.
या महाआरतीद्वारे केवळ धार्मिक श्रद्धा व्यक्त झाली नाही तर भाजपा कार्यकर्त्यांमधील एकजूट आणि नेतृत्वाबद्दलचा आदरही स्पष्टपणे दिसून आला.