वणी (ता.८ सप्टेंबर) – महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी येथील शेतकरी मंदिरात राज्यव्यापीकापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भव्य परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन प्रसिद्धअर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले (नागपूर) यांनी केले.
अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदसंपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. करमसिंग राजपूत होते. तसेच भाकप राष्ट्रीय कौंसिलर कॉ. तुकारामभस्मे (अमरावती), राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपुलवार (गडचिरोली), किसान सभेचेराज्याध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी (धुळे) आणि राज्य सरचिटणीस कॉ. अशोक सोनारकर (अमरावती) यांची प्रमुख उपस्थिती होती.
परिषदेत अॅड. प्रदीप नागापुरकर (नांदेड), कॉ. ओंकार पवार (परभणी), कॉ. सतिश चौधरी (अमरावती), संजय बाजड (वाशिम), कॉ. रामप्रभु कोरडे (हिंगोली), कॉ. सि. एन. देशमुख (बुलढाणा), कॉ. प्रकाश रेड्डी(चंद्रपूर), कॉ. द्वारका ईमडवार (वर्धा) यांसारखे मान्यवर पाहुणे उपस्थित राहिले.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, कापूस व सोयाबीनला हमीभाव, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणाऱ्याकमी दरांवर मार्गदर्शकांनी सविस्तर चर्चा केली. विविध ठराव पारित करून शेतकऱ्यांना संघटित करतआंदोलनात्मक वाटचाल करण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आला.
परिषदेची प्रस्तावना किसान सभेचे राज्य कौंसिलर कॉ. अनिल हेपट यांनी केली, तर संचालन जिल्हाध्यक्षकॉ. अनिल घाटे यांनी केले. आभार प्रदर्शन कॉ. सुनील गेडाम यांनी केले.
यवतमाळसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो शेतकरी परिषदेला उपस्थित राहिले. यशस्वितेसाठीकॉ. पंढरी मोहीतकर, गणेश कळसकर, मोरेश्वर कुंटलवार, रवि गोरे, गजानन पैसटवार, पांडुरंग ठावरी, प्रा. धनंजय आंबटकर, अथर्व निवडींग, प्रविण आडे, ऋषी उलमाले, वासुदेव गोहणे, सुरेखा हेपट, शंकरकेमेकार, राकेश खामणकर, दत्तु कोहळे, छाया गावंडे, प्रमोद पहुरकर, उत्तम गेडाम, दिनेश शिटलवार, मिलींद रामटेके, शैलेंद्र कांबळे, एकनाथ रायसिडाम, प्रदीप नगराळे, दिनेश पारखी आदींसह असंख्यकार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
या परिषदेच्या माध्यमातून शेतकरी चळवळीला नवचैतन्य लाभले असून, आगामी काळात कापूस वसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची दिशा ठरविण्यात आली आहे.