सौंदर्यीकरण, स्वच्छता व अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याची मागणी
शिवसेना (उबाठा) युवा नेते साकेत भुजबलराव यांच्या नेतृत्वात निवेदन
वणी /
वणी शहरातील थोर महापुरुषांचे पुतळे सध्या अत्यंत दयनीय स्थितीत असून, त्यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि अतिक्रमण हटाविण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेते साकेत अविनाश भुजबलराव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी, उपविभागीयअधिकारी वणी व नगर परिषद मुख्याधिकारी यांनासखोल मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
इतिहास, प्रेरणा आणि संस्कृतीची होणारी अवहेलना
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पं. नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्यटिळक, रविंद्रनाथ टागोर आदी थोर विभूतींचे पुतळे केवळ धातूचे नसून आपल्या शहराच्या इतिहासाचे आणिवैचारिक समृद्धीचे प्रतिक आहेत. परंतु सध्या हे पुतळे तुटलेल्या चबुतऱ्यांमध्ये, मोडकळीस आलेल्या संरक्षककठड्यांमध्ये, आणि बॅनरने वेढलेल्या अवस्थेत दिसत आहेत. गांधी चौकातील पुतळ्याच्या भोवती तर थेटजाहिरात बॅनर अडकवले जात आहेत!
*२०१३ नंतर दुर्लक्षित… आता तरुणांवरही परिणाम!* – साकेत भुजबलराव
२०१३ नंतर नगर परिषदेने एकही ठोस कृती केली नाही. परिणामी आज या प्रेरणादायी ठिकाणांकडे दुर्लक्ष होतअसून, नव्या पिढीला यातून चुकीचा संदेश जात आहे. “ज्यांनी देशासाठी जीवनदान दिले, त्यांच्याच पुतळ्यांची हीदुर्दशा! — ही शहरासाठी लज्जास्पद बाब आहे,” – *साकेत भुजबलराव*
सात दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन!
सर्व पुतळ्यांच्या परिसरातील अतिक्रमण, अनधिकृत बॅनर त्वरित काढावेत, चबुतरे, संरक्षक कठडे व ग्रॅनाइटटाईल्स यांची दुरुस्ती करावी, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, पुतळ्यांच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी यंत्रणाउभी करावीत, इत्यादी मागण्या येत्या ७ दिवसांत पूर्ण न झाल्यास, शिवसेना युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देखील भुजबलराव यांनीदिला आहे.
वास्तविक परिस्थितीचे पुरावे
या निवेदनासोबत सर्व पुतळ्यांचे प्रत्यक्ष फोटो, अतिक्रमणाचे दृश्य व अस्वच्छतेचे पुरावे देखील सादर करण्यातआले असून प्रशासनाने या गोष्टींची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देतेवेळी शिवसेना वणी शहर सचिव अजय चन्ने , उपशाखाप्रमुख विलास भट , सुजल तिवारी, सुनीलखडतकर , सागर सोनेकर , अनिकेत टिकले, अंकुश रावत , अरिहंत , आकाश खंडाळकर व शिवसेनेचे वयुवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.