वणी मध्ये श्री गणेशानंद नेत्रालय येथे १५ ऑगस्टला मोफत नेत्र तपासणी शिबिर…
७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या निमित्ताने डॉ. पवन संजय भंडारी (MS – नेत्ररोग तज्ञ) यांच्या वतीने वणी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मोतीबिंदू तपासणीसह नेत्र आरोग्यविषयक सल्लाही दिला जाणार आहे.
हे शिबिर १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत श्री गणेशानंद नेत्रालय, मणिप्रभा कॉम्प्लेक्स, नांदेपेरा रोड, एमएच २९ शॉप जवळ, वणी येथे होणार आहे.
शिबिरात खालील सेवा मोफत दिल्या जाणार आहेत:
डोळ्यांची तपासणी
मोतीबिंदू तपासणी
नेत्र आरोग्य मार्गदर्शन
डॉ. भंडारी यांनी वणी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, “आपल्या डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि मोतीबिंदूसारख्या आजारांचे लवकर निदान करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरेल. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या सेवांचा लाभ घ्यावा.”
अधिक माहितीसाठी संपर्क: ९४०३२०८३६८