कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांचा लॉंग मार्च
वणी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस विभागाकडून आज सकाळी भव्य लॉंग मार्च काढण्यात आला. पोलिसांचे पथक शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत नागरिकांमध्ये कायदा व सुरक्षिततेचा संदेश पोहोचवत होते.
या वेळी पोलीस निरीक्षकांनी सिटी हब मिडिया सोबत संवाद साधून शांतता राखण्याचे आवाहन केले. “शांतता व सुव्यवस्था टिकवणे ही फक्त पोलिसांची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता समाजात ऐक्य राखा,” असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून समाजात शांतता, ऐक्य आणि परस्पर सहकार्याचा संदेश दिला गेला.