समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान मान देनारा भरपूर कलेचा धनी – डॉ. विनोदकुमार आदे
“सर्वांना मान देऊन साधं जीवन जगणारा” म्हणजे असा माणूस त्यांच्यात भरपूर कला असताना त्यांना कोणता आव नाही
जो इतरांचा आदर करतो आणि साधेपणाने जीवन जगतो. तो दिखावा किंवा मोठेपणा टाळतो, आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान मान देतो. तो आहे डॉ. विनोदकुमार आदे
सामान्य घरात जन्मूनही असामान्य कर्तृत्व साकारणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. विनोदकुमार सदाशिव आदे. एकेकाळी मोलमजुरी करणाऱ्या हातांनी आयुष्याला कलात्मक आणि वैचारिक रंग दिला. जीवनातील प्रत्येक संघर्षाला आत्मविश्वासाने सामोरे जात, त्यांनी आपली वाट शोधली… नव्हे निर्माण केली.
बालपणापासून वेगळेपणाचा छंद, काहीतरी नवं करण्याची ओढ, हीच त्यांची ओळख होती. चित्रकला, रांगोळी, मूर्ती बनवणं, गाणं, अभिनय, सायन्स मॉडेल तयार करणं, कार्यक्रमांमध्ये फिल्मी शैलीने निवेदन करणं – हे सगळं त्यांचं फक्त छंद नव्हतं, तर गरज बनून राहिलं होतं.
ग्रामीण जीवनाचा नजरेने नव्हे, हृदयाने अनुभव घेतलेला डॉ. विनोदकुमार यांनी संघर्ष आणि जबाबदाऱ्या फार लवकर पेलल्या. स्वतः मणक्याच्या विकाराने त्रस्त असूनही त्यांनी वडिलांच्या आजारपणात कसलीही कसूर केली नाही. कलावंत सदाशिव बापूराव आदे यांना अखेरची साथ देताना जो समशानभूमीतील जनसमुदाय होता, तो त्यांच्या कुटुंबाबद्दलचा आदर आणि आपुलकी अधोरेखित करणारा होता.
वडिलांप्रतीची निस्सीम भावना व्यक्त करत, त्यांनी श्रद्धांजलीस्वरूप भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. साधू-संत, अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्नेही वर्गाचा त्या कार्यक्रमात झालेला सहभाग ही आदे कुटुंबाच्या सामाजिक स्थानाची साक्ष देणारी होती.
वडिलांच्या आठवणी शब्दबद्ध करत त्यांनी “बाप” काव्यसंग्रह आणि “माझा बाप काही केल्या मरत नाही” हा कथासंग्रह साकारला. त्यांच्या आधीचा “टुकार” काव्यसंग्रहही समाजमनात ठसा उमटवून गेला होता.
नवरगाव सारख्या दुर्गम भागातून मारेगाव, आणि पुढे वणी येथे येऊन त्यांनी आपली ओळख कलाक्षेत्रात निर्माण केली. नोकरीच्या शोधात आणि आत्मभानाच्या प्रवासात त्यांनी वृत्तवाहिनी स्थापून पत्रकारितेतही ठसा उमटवला. समाजातील अन्याय, अत्याचार, गरिबी, बेरोजगारी, व्यसनाधीनता यावर त्यांनी लेख, कविता, गीते लिहून आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रबोधन केले.
त्यांनी कधीही व्यसनांचा आधार घेतला नाही हेच त्यांचे मोठेपण! आज समाजातील तरुणांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. डिजिटल युगात, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करत, त्यांनी समाजप्रबोधनाचे सामर्थ्य दाखवले आहे.
त्यांच्यात असलेले शेकडो गुण, तंत्रज्ञानाची जाण, कलेवरील निष्ठा यामुळे आजही ते थांबलेले नाहीत. उलट, त्यांच्या उर्जेने ते सतत नव्याची दिशा शोधतात. त्यांच्या पुढील प्रवासात हीच त्यांची ऊर्जा, त्यांना अधिक उंचीवर घेऊन जाणार यात शंका नाही.
आज त्यांच्या कार्याचा आवाका पाहिला, तर स्पष्ट जाणवतं की डॉ. विनोदकुमार आदे हे केवळ एक नाव नाही, तर एक चळवळ आहे.
“विचारांनी समृद्ध, कलाक्षेत्रात चमकदार, आणि समाजकार्याने प्रेरणादायी” – अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !