विलास झट्टे उर्फ “साधा माणूस” यांचे नवीन गीत लवकरच प्रेक्षकांसमोर…
वणी तालुक्यातील साखरा (दरा) आणि मारेगाव येथे चित्रीत झालेले “साधा माणूस आपला विल्या र…” हे नवीन गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. साधा माणूस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण केलेल्या विलास झट्टे यांनी यात प्रमुख भूमिका साकारली असून त्यांच्या सोबत रवी वानखडे, विक्की खडसे, आदी निरगुळे, तन्मय सरोदे, आकाश महाडुळे, नितीन मुंजेकर, अमोल खडसे, संदीप डोंगे, कुणाल मुत्यलवार, गौरव दोडके, करण गेडाम, जतिन राऊत, कार्तिक नेहारे, संकेत जक्कूलवार, तसेचराणी तेलंग, भारती तेलंग, अनु धुमने, कोमल किन्हेकर, जोशना बदखल, शुभांगी निकोडे, वैष्णवीकुक्केवर, श्रुतिका डोंगे, अविनाश आरपलीवर, मंजुषा कोणप्रतीवर, स्वाती लिहितकर, रौनक बदखल यांचा समावेश आहे.
या गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायक महेश बेंडे असून, संगीत संयोजन शुभम चांदोरे (डार्कनाईट स्टुडिओ, वर्धा) यांनी केले आहे. दिग्दर्शन विदर्भातील लोकप्रिय यूट्यूबर रवी वानखडे यांचे असून नृत्यदिग्दर्शक म्हणून जतिन राऊत यांनी काम पाहिले आहे. छायाचित्रण इरफान शेख यांचे आहे.
या गाण्याची प्रस्तुती Vilas Zatte (Namune Production) या यूट्यूब चॅनेलवर होणार आहे. विशेष म्हणजे याचे भव्य प्रदर्शन कार्यक्रम वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालय येथे १९ ऑगस्ट रोजी होणार असून, यात चाहत्यांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.