Follow Us On

Saturday, March 7, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeविदर्भयवतमाळभाजप तर्फे आयोजित सेवा पंधरवड्यात आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि जनजागृतीचा संगम...

    भाजप तर्फे आयोजित सेवा पंधरवड्यात आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि जनजागृतीचा संगम…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img
    • भाजप तर्फे आयोजित सेवा पंधरवड्यात आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि जनजागृतीचा संगम…

    भाजप वणी विधानसभा कडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ उपक्रमांची मालिका जाहीर…

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे दरवर्षी ‘सेवा पंधरवाडा’ साजरा केला जातो. यावर्षी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ विविध सामाजिक व उपयुक्त उपक्रमांद्वारे वणी विधानसभा क्षेत्रात मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती वणी येथील विश्रामगृहात भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

     

    या कालावधीत नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीशी संबंधित अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये मोफत आरोग्य शिबिरे, नेत्रतपासणी, स्वच्छता मोहिमा, आयुष्मान भारत कार्ड मोहीम, वृक्षारोपण, जनजागृती रॅली तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय, महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचा समावेश आहे.

     ठळक कार्यक्रम व त्यांची ठिकाणे…

     

    १७ सप्टेंबर (बुधवार):

    बाजोरिया लॉन, वणी येथे सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य महाआरोग्य शिबीर. यामध्ये ई.एन.टी., दंतचिकित्सक, फिजिशियन, ऑर्थोपेडिक, नेत्रतज्ज्ञ यांच्यासह विविध तज्ञ डॉक्टरांची तपासणी मोफत केली जाणार आहे.

    संयोजक- एड.कुणाल चोरडिया…

     

    २० सप्टेंबर (शनिवार):

    जैताई मंदिर, वणी येथे सकाळी १० वाजता नेत्रतपासणी शिबीर. नागरिकांच्या दृष्टीसंबंधी समस्या तपासून आवश्यक मार्गदर्शन केले जाईल.

     

    २१ सप्टेंबर (रविवार):

    वणी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान. बसस्थानक, ग्रामीण रूग्णालय,सार्वजनिक ठिकाणे, शाळा-मंदिर परिसर याठिकाणी भाजप कार्यकर्ते व नागरिक एकत्रित येऊन स्वच्छता मोहीम राबवतील.

     

    २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर:

    आयुष्मान भारत कार्ड अभियान – वणी शहरातील १४ प्रभागांमध्ये तसेच शहरी व ग्रामीण दुर्गादेवी मंडळांमध्ये नागरिकांना निःशुल्क आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून दिले जाईल.

     

    २५ सप्टेंबर (गुरुवार):

     

    सकाळी ९ वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती प्रत्येक बुथवर विविध कार्यक्रमांनी साजरी होईल.

     

    सकाळी १० वाजता ‘एक पेड़ माँ के नाम अभियान’ अंतर्गत शाळा तसेच शासकीय कार्यालयात वृक्षारोपण केले जाईल.

     

    शहर व ग्रामीण भागात वोकल फॉर लोकल अभियान राबवून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाईल.

     

    दुपारी १२ वाजता एस.बी.लॉन येथे भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित केल्या जाईल,तसेच कार्यक्रमात बाप्पा माझा स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण केल्या जाईल…

     

     

    २ ऑक्टोबर (गुरुवार):

     

    महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता स्वच्छता अभियान तसेच जनजागृती कार्यक्रम.

    सकाळी १० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पंधरवाडा समारोप कार्यक्रम घेण्यात येईल…

     

    स्थळ- बसस्थानक जवळील भाजपचे संपर्क कर्यालय…

     

     

     

    ✨ कार्यक्रमाचे उद्दिष्ट

     

    भाजप वणी विधानसभा मंडळाचे पदाधिकारी यांनी सांगितले की, या उपक्रमांद्वारे समाजातील सर्वसामान्यांपर्यंत सेवा पोहोचवणे, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता जनजागृती, आरोग्य तपासणी व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

     

    🗣️ नेत्यांचे आवाहन

     

    वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ यशस्वी करावा, असे आवाहन भाजपचे पदाधिकारी व आयोजकांनी केले आहे.

    या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार,माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर भाजप उपजिल्हाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, कुणाल चोरडिया,

    शहर अध्यक्ष निलेश चौधरी तसेच वरिष्ठ नेते महादेव खाडे,अरूण कावडकर,अनुप राठी,मयुर गोयनका सोबत अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…

     

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Video thumbnail
    जय भवानी जय शिवाजी, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
    00:50
    Video thumbnail
    योग मुळे आता सर्व शक्य आहे, ना रोग ना टेंशन आता फक्त आनंद आणि उत्साह...
    15:48
    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Video thumbnail
    गावातील लोकं शिवलिंगावर कपडे धुवत होती मग काय घडलं,बघा या विडियो मध्ये...
    08:54
    Video thumbnail
    भालर येथील शेतकरी व रॉकवेल मिनरल्स कंपनी आमनेसामने,कंपनीच्या प्रदूषणामुळे नुकसान भरपाई ची मागणी...
    13:01
    Video thumbnail
    स्पेशल झुनका भाकर.#food #foodie ##strrefoods #indianfood #foodlover
    02:00
    Video thumbnail
    फिर याद आया वो गुजरा जमाना, वो भी क्या दिन थे।
    19:21
    Video thumbnail
    नगरपालिका के बगल में शौचालय,लेकिन नागरिक खुले में जाने को मजबूर।
    01:59
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए