स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आज…
सिटी हब मीडिया वणी…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे आज दुपारी 4.00 वाजता मंत्रालयासमोरील सचिवालयातील समिती सभागृहात माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
या पत्रकार परिषदेतून राज्यातील नगर परिषद, नगर पंचायत आणि जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाच्या घोषणा अपेक्षित आहेत. निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.
निवडणुकांच्या तारखा, आरक्षणाचे आराखडे, मतदार यादी व आचारसंहितेबाबतचे संकेत मिळण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने सर्व माध्यम प्रतिनिधींना या पत्रकार परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


























