Follow Us On

Monday, March 23, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रवणी आगाराचा धाडसी निर्णय! जीवघेणा मार्ग पाहून वणी आगाराने वणी-कोरपना-गडचांदूर मार्गावरील बससेवा...

    वणी आगाराचा धाडसी निर्णय! जीवघेणा मार्ग पाहून वणी आगाराने वणी-कोरपना-गडचांदूर मार्गावरील बससेवा बंद केली…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया

    वणी-कोरपना बससेवा उद्यापासून बंद; प्रवाशांचे हाल, रस्ता दुरुस्तीची मागणी ऐकूनही प्रशासन मौन…

    वणी ते कोरपना आणि गडचांदूर दरम्यान धावणारी राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बससेवा उद्यापासून बंद होणार असल्याची माहिती मिळाली असून, या निर्णयामुळे प्रवाश्यांसह विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसणार आहे.

    वणी, कोरपना, शिरपूर मार्गावरील राज्य महामार्गाची स्थिती इतकी बिघडली आहे की, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः “जीव धोक्यात घालण्यासारखे” झाले आहे.

    रस्त्याची दयनीय अवस्था, प्रवाशांचा जीव धोक्यात

    गेल्या अनेक वर्षांपासून वणी-कोरपना मार्गावरील डांबरी रस्ता खड्डेमय झाला आहे. पावसाळ्यानंतर तर या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून, रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत.

    या मार्गावरून एस.टी. बससोबतच खाजगी प्रवासी वाहनं, दुचाकी तसेच WCL (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) ची मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करणारी ट्रक वाहतूक सतत सुरू असते. या अवजड वाहनांच्या ये-जा मुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत गेली आहे.

     

    अनेक अपघात, जीवितहानीच्या घटना

    खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून, काही गंभीर घटनांमध्ये प्रवासी जखमी झाले आहेत. अनेक दुचाकीस्वारांना किरकोळ अपघातांचा सामना करावा लागला असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या सगळ्यामुळे नागरिक आणि प्रवासी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

    एस.टी. विभागाचे पत्र — “रस्ता दुरुस्तीपर्यंत सेवा बंद”

    वणी आगार व्यवस्थापक विवेक बन्सोड यांनी स्वतः या मार्गाची पाहणी केली असता रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था निदर्शनास आली. अनेक ठिकाणी खोल खड्डे, तुटलेला डांबर आणि उघडे गोटे यामुळे बस चालवणे अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी पाहिले.

    त्यामुळे, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून वणी आगाराने या मार्गावरील एस.टी. सेवा रस्ता दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

    ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागालाही (PWD) लेखी स्वरूपात देण्यात आली आहे.

    वणी आगाराने वारंवार दिले निवेदन — पण दुर्लक्षच

    या मार्गाच्या दुरुस्तीबाबत वणी आगाराने गेल्या काही महिन्यांत वारंवार पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती केली होती. मात्र, विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट, विभागाने हेच पत्र पाठवले की “शिंदोला मार्ग दळणवळणासाठी योग्य आहे” — हे विधान प्रत्यक्ष वास्तवाला पूर्णपणे छेद देणारे असल्याची टीका होत आहे.

    विद्यार्थी आणि प्रवासी मोठ्या अडचणीत

    वणी, कोरपना, गडचांदूर, ढाकोरीबोरी, कुरई, आबाईफाटा या मार्गावरील असंख्य विद्यार्थी रोज शाळा आणि महाविद्यालयासाठी एस.टी.ने प्रवास करतात.

    सेवा बंद झाल्यामुळे आता या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागणार आहे, जे केवळ खर्चिकच नव्हे तर धोकादायकही आहे.

    कामावर जाणारे नोकरदार वर्ग, शेतमाल विक्रीसाठी जाणारे शेतकरी, तसेच दैनंदिन कामासाठी प्रवास करणारे नागरिक यांनाही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

    सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण

    सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या मार्गाची दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला पत्र पाठवले असून लवकरच दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल.”

    तथापि, नेमके “लवकर” म्हणजे किती दिवस, याबाबत मात्र त्यांनी कोणतीही स्पष्टता दिली नाही.

    जनतेचा सवाल — ‘आता तरी कुणी जबाबदारी घेणार?’

    रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात काम सुरू होत नाही.

    मागील काळात विद्यमान आमदारांनी या रस्त्यावर आंदोलन केले होते आणि लवकरच दुरुस्ती होईल असे सांगितले होते, परंतु आजही परिस्थिती जैसे थेच आहे.

    दरम्यान, प्रशासन, बांधकाम विभाग, आणि जनप्रतिनिधी या तिघांमध्ये जबाबदारी झटकण्याचे खेळ सुरू असून, सर्वसामान्य प्रवासी मात्र जीव धोक्यात घालून प्रवास करण्यास मजबूर आहेत.

    अजून किती मरणयातना?

    आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की — “या मार्गावरील लोकांना अजून किती काळ जीवघेण्या रस्त्यावरून प्रवास करावा लागणार?”

    सर्व संबंधित विभागांनी परस्पर जबाबदारी झटकण्यापेक्षा तातडीने प्रत्यक्ष कारवाई करणे गरजेचे आहे.

    जोपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रवाशांना सुरक्षित आणि परवडणारा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य ठरते.

    असे न झाल्यास या भागातील नागरिकांचा रोष तीव्र होणार यात शंका नाही.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
    10:13
    Video thumbnail
    सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
    05:33
    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए