Homeक्राइमड्रग्स विरोधात वणी पोलिसांची धडक मोहीम सुरूच: कोट्यवधींचे ड्रग्ज रॅकेट रडारवर, आतापर्यंत...

ड्रग्स विरोधात वणी पोलिसांची धडक मोहीम सुरूच: कोट्यवधींचे ड्रग्ज रॅकेट रडारवर, आतापर्यंत ८ आरोपी अटकेत!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणी आणि परिसरात ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; एमडी तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठ यश…

युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या एका मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा वणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. वणी शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात पसरलेल्या मॅफेड्रॉन (MD) या अमली पदार्थाच्या काळ्या बाजाराविरोधात ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत तब्बल आठ संशयितांना अटक करण्यात आली असून, हा तपास आता इतर शहरांपर्यंत पोहोचला आहे.

अशी झाली कारवाईची सुरुवात:

या मोठ्या रॅकेटचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) एका गोपनीय माहितीद्वारे लागला. जून महिन्याच्या मध्यात, पोलिसांनी एसपीएम शाळा परिसराजवळ सापळा रचून सौरभ खैरे आणि प्रथमेश गुंडेवार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ६ ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. येथूनच पोलिसांच्या हाती या रॅकेटचे मुख्य धागेदोरे लागले.

तपासाची चक्रे फिरली आणि नावे समोर आली:

दोघांच्या चौकशीनंतर तपासाची गती वाढवत पोलिसांनी वरोरा येथील रहिवासी अक्षय पेचे याला ७ ग्रॅम अमली पदार्थासह अटक केली. संशयितांच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल बँक ट्रान्झॅक्शन्सच्या सखोल तपासणीनंतर धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये वेकोली (WCL) कर्मचारी अविनाश पाटील, प्रज्योत ऊर्फ कॉकरोच उपरे आणि रवींद्र गुप्ता यांचा थेट सहभाग आढळल्याने त्यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा पुढचा टप्पा गाठत तेलीफेल येथील रहिवासी गोलू मेश्राम याला १९.२७ ग्रॅम एमडी पावडरसह ताब्यात घेतले.

हिंगणघाट आणि नागपूर कनेक्शन उघड:

या नेटवर्कची पाळेमुळे केवळ वणीपुरती मर्यादित नसून विदर्भातील इतर शहरांमध्येही पसरल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी हिंगणघाट येथून युसूफ नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे, ज्याच्या अटकेमुळे आरोपींची एकूण संख्या आठ झाली आहे. दुसरीकडे, शिरपूर पोलिसांनीही या गुन्ह्याशी संबंधित मुख्य पुरवठादार राजिक अन्सारी याला थेट नागपूरमधून अटक करून कारागृहात रवाना केले आहे. यापूर्वी शिरपूर पोलिसांनी चंद्रपूर-वणी महामार्गावर श्रेयस ऊर्फ गुड्डू पाटील आणि अक्षय बागडदे यांना ५६ ग्रॅम ड्रग्जसह कारमध्ये पकडले होते.

अनेक संशयित पोलिसांच्या रडारवर:

अटक केलेल्या सर्व आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ड्रग्जच्या पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या आणि या व्यवसायाशी जोडल्या गेलेल्या शेकडो लोकांची नावे सध्या पोलिसांच्या संशयित यादीत आहेत. येत्या काळात या प्रकरणात अनेक नामांकित आणि पांढरपेशा चेहरे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए