Homeदेश विदेशशून्यातून निर्माण केलेले स्वकर्तृत्व! वणी शहराचे धडाडीचे 'युवा नेतृत्व' अ‍ॅड. निलेश चौधरी...

शून्यातून निर्माण केलेले स्वकर्तृत्व! वणी शहराचे धडाडीचे ‘युवा नेतृत्व’ अ‍ॅड. निलेश चौधरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

संघर्षातून घडलेले चाणाक्ष नेतृत्व! वणी भाजप शहराध्यक्ष अ‍ॅड. निलेश चौधरी यांचा आज वाढदिवस; ऐतिहासिक विजयानंतर आगामी निवडणुकांवर नजर…कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अत्यंत खडतर संघर्षातून, सामाजिक बांधिलकीतून आणि धडाडीच्या नेतृत्वाच्या जोरावर वणी शहराच्या सार्वजनिक व राजकीय जीवनात स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करणारे अ‍ॅड. निलेश माया महादेव चौधरी यांचा आज, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी वाढदिवस आहे. आपल्या अभ्यासू वकिली व्यवसायासोबतच राजकारणातही अत्यंत चाणाक्ष व कुशल रणनीतीकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून, आज वणी शहरात त्यांच्याकडे भाजपचे सक्षम आणि लोकप्रिय ‘युवा नेतृत्व’ म्हणून पाहिले जाते.

संघर्षातून घडलेला जीवनप्रवास आणि वकिलीतील ठसा…७ ऑक्टोबर १९८० रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या अ‍ॅड. निलेश चौधरी यांचे वडील वणी पंचायत समितीत ओरशीअर (Orseer) म्हणून कार्यरत होते. पाच भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या निलेश चौधरी यांना ताई व भावाचे मोलाचे सहकार्य लाभले. शालेय जीवनात एन.सी.सी.च्या (NCC) माध्यमातून देशप्रेमाची रुजलेली भावना आणि महाविद्यालयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यापीठ प्रतिनिधी (UR) म्हणून केलेल्या कामातून त्यांच्यातील नेतृत्वगुण उजळून निघाले.

LL.B. व LL.M. पूर्ण केल्यानंतर २००४ सालापासून त्यांनी वकिली व्यवसायात पदार्पण केले. अभ्यासू वृत्ती, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी कायदे क्षेत्रात स्वतःचे नामांकित स्थान निर्माण केले.

समाजकारणाचा भक्कम पाया: ‘रॉयल फाऊंडेशन’…वकिली व्यवसाय सांभाळतानाच सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी रोटरी क्लब आणि त्यानंतर स्थापन केलेल्या ‘रॉयल फाऊंडेशन’च्या माध्यमातून गरजू, दुर्बल घटकांसाठी आरोग्य व विविध मदतकार्यांचे उपक्रम राबवले. या समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी वणीत कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे मोठे जाळे विणले.

पहिलीच राजकीय कसोटी आणि नगरपालिकेत ऐतिहासिक विजय…

राजकारणाचा कोणताही प्रदीर्घ अनुभव नसताना आणि एक प्रकारे नवखे असतानाच पक्षाने त्यांच्यातील संघटन कौशल्य ओळखून त्यांच्यावर वणी भाजप शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली. शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांची पहिली मोठी कसोटी होती ती म्हणजे ‘वणी नगरपालिका निवडणूक’.

भाजपचे वरिष्ठ नेते माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. निलेश चौधरी यांनी ही निवडणूक मोहीम फत्ते केली. त्यांच्या सूक्ष्म नियोजन कौशल्यामुळे, अचूक मीडिया मॅनेजमेंटमुळे आणि कार्यकर्त्यांच्या नव्या दमाच्या टीममुळे भाजपने नगराध्यक्षासह तब्बल १९ जागांवर दणदणीत विजय मिळवून नगरपालिकेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. “फक्त आणि फक्त भाजपच शहराचा खरा विकास करू शकते,” हे वणीच्या जनतेला पटवून देण्यात ते पूर्णपणे यशस्वी ठरले.

वरिष्ठांची मर्जी आणि निष्ठावंत कार्यकर्ता…पक्षाचा कोणताही कार्यक्रम वा आंदोलन असो, सर्वांत आधी हजर राहणारे आणि कनिष्ठ ते वरिष्ठ सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे वरिष्ठ नेत्यांची मर्जी त्यांनी संपादन केली असून पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या कामगिरीवर भलतेच खूश आहेत. नगरपालिकेच्या ऐतिहासिक यशानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही त्यांच्या या रणनीतीचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे.

“भाजपची घोडदौड कायम ठेवणार” – वाढदिवशी संकल्प–आपल्या वाढदिवसानिमित्त भावना व्यक्त करताना अ‍ॅड. निलेश चौधरी यांनी पक्षाची विजयाची घोडदौड अशीच कायम ठेवण्याचा संकल्प केला आहे.

 “भारतीय जनता पार्टी हा लोकांसाठी झटणारा आणि विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे. येणाऱ्या काळात वणी शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलून सर्वसमावेशक विकास केला जाईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कनिष्ठ ते वरिष्ठ सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेले, निष्ठावंत संघटक, अभ्यासू वकील व समाजसेवक अ‍ॅड. निलेश चौधरी यांना ‘सिटी हब मीडिया’ कडून वाढदिवसाच्या आणि भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस उदंड शुभेच्छा!

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए