वणीतील प्रमुख कांग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेंद्र लोढा हे कांग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी (अजितपवार) पक्षात प्रवेश करणार आहेत अशी बातमी समोर येत आहे…
मागील काही दिवसांपासून त्यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती आणि महत्त्वपूर्ण जवाबदारी मिळत नसल्याने ते नाराज होते व आता त्यांनी आपला नवीन रस्ता निवडला असून ते येत्या 12 ऑगस्ट ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात सामील होणार आहेत व त्यांना महत्त्वपूर्ण जवाबदारी मिळण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे…

डॉ.लोढा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने वणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे व लोढा यांनी दावा केला आहे की त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते ही राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करतील…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डॉ. लोढा हे सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रवादी साठी नवीन समीकरण व संधी निर्माण करतील अशी चिन्हे दिसत आहेत…

























