इजासन येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा मानवी हक्क अधिकार कार्यकर्ते विजय बलकी यांच्यानेतृत्वात रस्त्यांच्या कडेला असलेली झुडपे तोडण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदनदेण्यात आले
वणी तालुक्यातील सैंदाबाद फाटा ते इजासन गावापर्यंत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात मोठमोठीझाडेझुडपे वाढलेली असून यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना तसेच पायी चालणाऱ्यांनामोठ्या प्रमाणात या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

त्यातच झाडा झुडपांनी व रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झुडूपांमुळे दृश्यमानता कमी झाली असूनवाहनांचा अपघात होण्याचा धोका वाढला असून विशेषता रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता अधिकअसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचें वातावरण आहे. तरी संबंधित जिल्हा परीषद बांधकाम विभागाने याझुडपांची विल्हेवाट लावून रस्ता मोकळा करून द्यावा. अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते विजयबलकी यांच्या नेतृत्वात इजासन येथील ग्रामस्थांनी केली आहे.

तर निवेदन देतेवेळी, युवा सामाजिक कार्यकर्ते विजय बलकी, कुंभारखणी(इजासन) गट ग्रामपंचायतसदस्य संकेतदादा मोहिते, पत्रकार योगेश तेजे, सुरेश खामनकर, दिवाकर काकडे, आणि इजासन येथीलग्रामस्थ उपस्थित होते.

























