वणीतील सार्वजनिक बांधकाम विभागात महिला लिपिकाचे गैरवर्तन प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाचीदखल…
सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत असलेल्या एका महिला वरिष्ठ लिपिकानी कार्यालयातवारंवार गैरहजर राहणे, अर्जदारांशी उद्धट वर्तन करणे आणि असभ्य भाषेचा वापर केल्याचा गंभीर प्रकारसमोर आला आहे. माहिती अधिकार (RTI) अंतर्गत माहिती घेण्यासाठी आलेल्या एका अर्जदार मोहब्बतखान यांनी केलेल्या फोनवरून हा प्रकार उघडकीस आला.


अर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लिपिक अनेकदा कार्यालयात हजर नसतात. आवश्यकमाहिती देण्याऐवजी त्यांनी फोनवर उद्धटपणे बोलून अर्जदाराचा अपमान केला, असे आरोप आहेत. याघटनेमुळे संबंधित लिपिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
संबंधित वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याने अर्जदार मोहब्बत खान यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्रीकार्यालयात ईमेल द्वारे तक्रार दाखल केली व नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या तक्रारीची दखल घेतसंबंधित विभागाकडे प्रकरण चौकशी साठी पाठशले असून लवकरच उद्धट महिला लिपीकवर कारवाईहोईल अशी शक्यता आहे…
सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणे, नागरिकांशी अशिष्ट वर्तन करणेहा गंभीर गैरव्यवहार मानला जातो. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणारअसल्याचे संकेत मिळाले आहेत.

नागरिकांमध्ये याप्रकरणी संताप व्यक्त होत असून, सरकारी कार्यालयांमध्ये वेळेवर उपस्थिती आणिशिस्त राखली जावी, यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.

























