यंदा वणी शहरात जन्माष्टमी महोत्सव 2025 मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीच्या वतीने 13 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.13 ऑगस्ट ला जन्माष्टमी महोत्सवाची सुरुवात अमृतभवन येथे फॅन्सी ड्रेस भगवान श्रीकृष्ण दर्शन वेशभूषा,लकी लेडी, लकी चाईल्ड ,कृष्ण झूला डेकोरेशन,मटकी डेकोरेशन,एक मिनिट स्पर्धा, भजन संध्या,अश्या विविधरंगी कार्यक्रमांनी झाली.
14 ऑगस्ट संध्याकाळी 4 वाजता रोजी पाणीच्या टाकीच्या मैदानावर भव्य नृत्य स्पर्धा होणार आहे ज्यामध्ये स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

मुख्य आकर्षण 15 ऑगस्ट रोजीचे भव्य जागरण असून, इंडियन आयडॉल फेम सुप्रसिद्ध भजन गायक हेमंत बृजवासी आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता पाणीच्या टाकीच्या मैदानावर होणार आहे.
सगळ्या कार्यक्रमांसाठी मोठा वॉटरप्रूफ मंडप ग्राऊंडवर उभारण्यात आला आहे त्यामुळे पाऊसाचा या कार्यक्रमांवर कुठलाही परिणाम होणार नाही…

त्यामुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया व आयोजक समितीने केले आहे.

























