वणी तालुक्यातील ब्राम्हणी फाटा ते निळापुर रोड येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
16 ऑगस्ट 2025, वेळ : सायं. 5:30 वा.
पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा (क्र. MH34BF2140) मधून दोन इसम अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. तत्काळ सापळा रचून कारवाई करण्यात आली.

या कारवाईत
विविध विदेशी कंपनीची दारू : ₹82,980/-
इर्टिगा फोर व्हिलर (वाहन) : ₹6,00,000/-
👉 एकूण जप्त मुद्देमाल : ₹6,82,980/-
🚨 ताब्यात घेतलेले आरोपी –
1. प्रविण शंकरराव मुन (वय 50 वर्ष)
2. विठ्ठल वासूदेव पोलशेट्टीवार (वय 60 वर्ष)
(दोघेही रा. घुग्गुस, जि. चंद्रपूर)
दोघांवर कलम 65 (अ) (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
🔹 ही कारवाई माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने, पोउपनि धिरज गुल्हाने व डि.बी. पथकाच्या चमूने केली.

👉 पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

























