वणी | दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी येथील शासकीय मैदानावर बैल पोळा उत्सवाचे भव्य आयोजनकरण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पारंपरिक उत्सवासाठी गावात उत्साहाचे वातावरण आहे.
यंदा विशेष आकर्षण म्हणजे, आपल्या बैलजोडीला सुंदर व पारंपरिक पद्धतीने सजवून आणणाऱ्या शेतकरी बांधवांना समितीच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सजावटीच्या बैलजोडींचे निरीक्षण करून सर्वोत्तम जोडींची निवड करण्यात येईल.
समितीच्या माहितीनुसार, संध्याकाळी ५.३० वाजता विधिवत पूजन कार्यक्रम पार पडणार असून, मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीसाठी पोळा उत्सव समिती वणी तर्फे युद्धपातळीवर तयारी सुरू असून, मार्गदर्शक श्री. नितीन पाटील शिरभाते, संयोजक श्री. रवींद्र धुळे तसेच समितीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

या पारंपरिक सणामुळे गावात ऐक्य, उत्साह व संस्कृतीचे दर्शन घडणार असून, शेतकरी बांधवांसाठी हा आनंदाचा सोहळा ठरणार आहे.

























