वणी : पोळा सणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वणी शहराच्या वतीने तान्हा पोळा सजावटस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५.०० वा. कळ्याण मंडप, मोठा हनुमान मंदिर जवळ, वणी येथे होणार आहे.
स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येणार असून, ‘अ’ गटात १ ते ५ वर्षे वयोगटातील मुले तर ‘ब’ गटात ५ ते १२वर्षे वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतील. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

‘अ’ गटात प्रथम बक्षिस ५,,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये व तृतीय २,००० रुपये असे बक्षिसठरविण्यात आले आहे. तर ‘ब’ गटातही प्रथम बक्षिस ५,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये व तृतीय२,००० रुपये इतकी बक्षिसे असतील. याशिवाय प्रत्येक गटातील विजेत्यांना व सहभागींना प्रोत्साहनपर बक्षिसे देखील दिली जातील.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत आपली नोंदणी करणेआवश्यक आहे. तसेच स्पर्धा सुरू होण्याच्या १० मिनिटे आधी स्पर्धक उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रवि बेलुरकर असून, आयोजन समितीत आशिष डंभारे, नितीन बिहारी, विलास डवरे राजेंद्र जयस्वाल यांचा सहभाग आहे. स्पर्धेत सर्वांसाठी प्रवेश निशुल्क ठेवण्यात आला आहे.

👉 पोळ्याच्या पारंपरिक सणात लहान मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी व संस्कृती जपण्यासाठी ही स्पर्धाउपयुक्त ठरणार आहे.

























