HomeAgroवणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी...

वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी,अतीवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात निवेदन…

अन्यथा शेतक-यांना सोबत घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल – संजय खाडे यांचा इशारा,

वर्धा व पैनगंगेला आलेल्या पुरामुळे व अतीवृष्टीमुळे शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली…

 

 

 अतीवृष्टीमुळे वणी उपविभागातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. ऑगस्ट महिन्यात झरी व वणी तालुक्यात तर या महिन्यात वणी व मारेगाव तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज तहसिल कार्यालयात धडक दिली. मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. हे निवेदन काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.

 

वणी विधानसभा क्षेत्रात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार व संततधार पावसामुळे वर्धा नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे नांदेपेरा, शेलू, रांगणा, भुरकी, गोवारी, कोलेरा, पिंपळगाव, जुनी उकणी, निलजई, बेलोरा इत्यादी गावांतील पीक पूर्णतः पाण्याखाली गेले. तर गेल्या महिन्यात अतीवृष्टीमुळे पैनगंगा नदीला पूर आला होता. यामुळे झरी व वणी तालुक्यातील पैनगंगे काठच्या शेतशिवारातील शेती पाण्याखाली आली. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते. सलग दोन महिन्यांतील या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

 

या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतक-यांना एकरी 50 हजारांचे अनुदान द्यावे, यासह सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा. सीसीआय कापूस नोंदणीची मुदत वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जर ओला दुष्काळ जाहीर न केल्यास काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.

 

अन्यथा शेतक-यांना घेऊन रस्त्यावर उतरू

सततच्या अतीवृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे कठिण झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला असताना शासन अजूनही मौन बाळगून बसले आहे. त्यामुळे वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. अन्यथा आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन छेडू.

— संजय रामचंद्र खाडे, प्रदेश सचिव, काँग्रेस

 

निवेदन देते वेळी पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, तेजराज बोढे, डॉ. शंकर व-हाटे, उत्तम गेडाम, विकेश पानघटे, प्रमोद लोणारे, देवराव देऊळकर, दिनेश पाहूनकर, उषा नरेंद्र काटोके, विनित तोडकर, पुंडलीक गुंजेकर, संदीप कांबळे, प्रफुल्ल वाळके, नरेंद्र चिकटे, महादेव तुराणकर, सुधीर खंडारकर, संजय शेंडे यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Video thumbnail
‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
05:27
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए