वणी पोलिसांचा डिजिटल पराक्रम – हरवलेले १३ मोबाईल मालकांच्या हाती परत…
वणी : मोबाईल हरवल्यावर माणसाचे जणू अर्धे आयुष्यच हरवल्यासारखे वाटते. अशा अनेक तक्रारी वणी पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी नोंदवल्या होत्या. पण सायबर विभागातील महिला पोलीस अंमलदार छाया उंमरे यांनी आपली तपासकौशल्ये दाखवत CEIR पोर्टलच्या मदतीने हरवलेला ठावठिकाणा शोधून काढला.
परिणाम काय? तब्बल १३ हरवलेले मोबाईल तांत्रिक तपासाअंती सापडले आणि आज दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी हे मोबाईल त्यांच्या मुळ मालकांच्या हाती परत करण्यात आले. हरवलेला मोबाईल मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा लखलखता प्रकाश उमटला.

ही कार्यवाही मा. ठाणेदार वणी यांच्या मार्गदर्शनाखाली, एलपीसी ४९३ छाया उंमरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या उपक्रमामुळे जनतेत पुन्हा एकदा वणी पोलिसांबद्दल विश्वास आणि समाधानाची भावना दृढ झाली आहे.
👉 हरवलेला मोबाईल परत मिळाला की फक्त वस्तू नाही, तर आठवणी, संपर्क आणि आशा देखील परत मिळतात – आणि हे शक्य केले आहे वणी पोलिसांच्या स्मार्ट वर्कने! 📱👮♀️

























