नवरात्राच्या पार्श्वभूमीवर हरियाण्यातील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत… नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वाची तयारी सुरू आहे. या सणाचा धार्मिक व आध्यात्मिक उत्साह अनुभवायला वणी नगरी सज्ज झाली आहे. यावर्षी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील नवशक्ती दुर्गा माता मंदिर समितीने एक खास उपक्रम राबवला आहे – हरियाणातील कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत वणी येथे विधीपूर्वक प्रतिष्ठापित केली जाणार आहे.
कार्यक्रमाची माहिती…
अखंड ज्योत वणी येथे घटस्थापनाच्या दिवशी, म्हणजे सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी आणली जाईल.
दुर्गा माता मंदिरात विधीपूर्वक स्थापना होऊन नवरात्रभर अखंड दर्शनासाठी ठेवण्यात येईल.
दररोज आरती, भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.
परंपरेचा मान
वणीतील मंदिर समिती दरवर्षी एका शक्तीपीठातून अखंड ज्योत आणण्याची परंपरा जोपासते. मागील वर्षी माहूरची रेणुका माता, तर त्यापूर्वी तुळजापूरची तुळजाभवानी माता यांची अखंड ज्योत वणीमध्ये आणण्यात आली होती. यावर्षी कुरुक्षेत्र येथील भद्रकाली मातेची अखंड ज्योत वणीकरांच्या श्रद्धास्थानी सजणार आहे.

भाविकांसाठी आवाहन,
मंदिर समितीकडून आवाहन करण्यात आले आहे की, नवरात्र महोत्सवादरम्यान भाविकांनी या दिव्य अखंड ज्योतीचे दर्शन घेऊन जीवन मंगलमय करावे आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश पुढे न्यावा.
या आयोजनात रवि बेलुरकर, दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदाडे, अमोल बदखल, राजकुमार अमरवानी, विलास डवरे, सतीश कामटकर, नितीन मसेवर, धम्मा मनवर, अशोक मांदडे, संजय लोणारे, विनोद मुथा, चंद्रकांत फेरवानी,
राजु जयरामवाल, समीर लाभसेटवार, मनु महाराज तुगनायत, अशोकजी बतरा यांचा सक्रिय सहभाग आहे.

























