Homeमहाराष्ट्र*मालमत्ता करवाढीविरोधात काँग्रेसची पालिकेवर धडक*संजय खाडे यांचा नगरपरिषद प्रशासनाला इशारा...

*मालमत्ता करवाढीविरोधात काँग्रेसची पालिकेवर धडक*संजय खाडे यांचा नगरपरिषद प्रशासनाला इशारा…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

*मालमत्ता करवाढीविरोधात काँग्रेसची पालिकेवर धडक**मालमत्ता करवाढीविरोधात काँग्रेसची पालिकेवर धडक*

करवाढ रद्द न झाल्यास मोठे आंदोलन, काँग्रेसचा इशारा

नगरपालिकेची हुकुमशाहीकडे वाटचाल – संजय खाडे…

 

वणी: वणी नगरपालिकेच्या मालमत्ता करवाढीविरोधात काँग्रेसने जनतेच्या वतीने जोरदार आवाज उठवला आहे. सोमवार, दि. 22 सप्टेंबर रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक देत करवाढ मागे घेण्याबाबत निवेदन सादर केले. काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात वणी शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मुख्याधिकारीमार्फत हे निवेदन देण्यात आले. जर ही जाचक करवाढ रद्द न केल्यास वणीकरांसह मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

 

नुकतीच वणी नगरपालिकेने नवीन मालमत्ता कर आकारणी लागू केली असून, ही आकारणी गेल्या कराच्या दुप्पट आहे. या नवीन कराबाबतच्या नोटिसा वणीकरांच्या घरी पोहोचू लागल्या आहेत. मात्र, या करवाढीचा कोणताही ठराव घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आकारणी पुढील चार वर्षांसाठी लागू करण्यात आली असून, यामुळे वणीकरांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे ही करवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

नगरपालिकेची हुकुमशाहीकडे वाटचाल – संजय खाडे

आधीच वीज बील, महागाई याने सर्वसामान्य त्रस्त आहे. त्यातच पालिकेने ही जाचक करवाढ केली आहे. करवाढ करण्यासाठी कोणतीही समिती अस्तित्वात नाही. याबाबत कोणताही ठराव झाला नाही. अधिकारी हे हुकुमशाही पद्धतीने निर्णय घेत आहे. त्यामुळे ही करवाढ अवैध असून वणीकरांना कोणाताही आर्थिक फटका बसू दिला जाणार. 

 

वणी शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून, त्यात डबके साचत आहेत. तसेच अनेक ठिकाणी पावसामुळे झाडे-डुडपे वाढली असून, साफसफाईकडे पालिकेचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप करत निवेदनात पालिका प्रशासनावर निशाणा साधण्यात आला. 

 

  1. या वेळी अशोक चिकटे, प्रफुल्ल उपरे, रामदास कुचनकर, संदीप कांबळे, रवी कोटावर, राजू डवरे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रेमनाथ मंगाम, कैलास पचारे, सुधीर खंडाळकर, कैसर पटेल, ओम ठाकूर, विकेश पानघाटे, अशोक पांडे, राजू अंकितवार, गणेश बोंडे, तोशीब अहमद, सुमित डवरे, विनीत तोडकर, संजय शेंडे आणि नरेंद्र काटोके यांच्यासह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए