Homeमहाराष्ट्रभाजपला वणीत मोठा धक्का : राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांचा शिंदे...

भाजपला वणीत मोठा धक्का : राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांचा शिंदे गटात प्रवेश…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

भाजपला वणीत मोठा धक्का : राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांचा शिंदे गटात प्रवेश…

 

वणीच्या राजकीय वर्तुळात आज मोठा भूकंप घडला आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि वणीतील ज्येष्ठ समाजसेवक विजय चोरडिया यांनी आज शिवसेना (बालासाहेब ठाकरे) शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या घडामोडीमुळे भाजपला वणीत मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.

 

विजय चोरडिया यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, पालकमंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव गावंडे, मंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत पार पडला. विजय चोरडिया यांच्या समवेत आशिष काळे, राहुल मुंजेकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिवराज पेचे, अनिल ढगे आणि चंद्रकांत घुगुल यांचीही उपस्थिती होती.

 

विजय चोरडिया हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक कार्यांच्या माध्यमातून शहरात तसेच ग्रामीण भागात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला स्थानिक पातळीवर मोठा फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

मागील काही दिवसांपासून विजय चोरडिया भाजप नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती, मात्र ते प्रत्यक्षात पक्ष सोडतील याची कुणालाही अपेक्षा नव्हती. त्यांच्या या निर्णयाने भाजपच्या स्थानिक संघटनांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 

पक्षप्रवेशानंतर विजय चोरडिया यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटले की,

 

> “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वणीच्या विकासासाठी अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल. जनतेच्या अडचणी दूर करून त्यांच्या कामांना वेग देणे हे माझे उद्दिष्ट आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वणीच्या विकासाची गती धडाक्यात वाढवणार आहे.”

 

 

 

विशेष म्हणजे, विजय चोरडिया यांचे पुत्र कुणाल चोरडिया यांची नुकतीच भाजप यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता “पिता शिवसेना शिंदे गटात आणि पुत्र भाजपमध्ये” अशी आगळीवेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे वणीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. आगामी काही दिवसांत या निर्णयाचा नेमका परिणाम काय होतो आणि भाजप या धक्क्यातून स्वतःला कसा सावरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए