*‘अमृत’ तर्फे दीपावलीत होणार “विश्वविक्रमी” अमृत दुर्गोत्सव!*
१२ ऐतिहासिक दुर्गांची प्रतिकृती साकारून शिवछत्रपतींना अनोखी मानवंदना…
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रतिष्ठान (अमृत) या संस्थेतर्फे यंदाच्या दीपावलीत अमृत दुर्गोत्सव २०२५ या विश्वविक्रमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला राज्यभरातील अबाल वृद्धांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
“अमृत महाराष्ट्र” आयोजित , या उपक्रमात महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक दुर्गांची प्रतिकृती साकारण्यात येणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी विश्वविक्रमी मानवंदना देण्यात येणार आहे.
या दुर्गांमध्ये रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, लोहगड, राजगड, जिंजी आणि विजयदुर्ग, शिवनेरी, खांदेरी या दुर्गांचा समावेश आहे. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या दुर्गांच्या प्रतिकृती आपल्या घराच्या अंगणात फ्लॅटमध्ये अथवा मोकळ्या जागेमध्ये तयार करायच्या आहेत.
आपण केलेली दुर्ग अथवा गडाची प्रतिकृती आपल्या‘सेल्फी सह www.durgotsav.com’ या संकेतस्थळावर अपलोड करायची आहे. सदर प्रक्रिया अत्यंत सोपी असून यामध्ये केवळ आपण बनवलेल्या 12 पैकी कोणत्याही गडदुर्गाची प्रतिकृती सेल्फी द्वारे अपलोड करायची आहे त्यामध्ये आपले स्वतःचे नाव व जिल्हा टाकायचा आहे जेणेकरून माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र आपणास उपलब्ध होणार आहे.
अमृत दुर्गोत्सवाबाबत संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तसेच, या दुर्गुत्सवामुळे शिवछत्रपतींना विश्वविक्रमी मानवंदना मिळणार आहे व इतिहासप्रेमी व विद्यार्थ्यांना दुर्गांची माहिती, शिवचरित्राचे अध्ययन आणि प्रेरणादायी इतिहास याचे अध्ययन करण्याची संधी मिळेल.
हा उपक्रम महाराष्ट्राच्या दुर्गसंस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करणारा ठरणार आहे. ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद सोहळा ठरेल, असा विश्वास अमृतचे अमरावती विभागीय व्यवस्थापक श्री प्रविणजी कोळेश्वर जिल्हा व्यवस्थापक श्री परीक्षीत शर्मा उपव्यवस्थापक श्री कामेशजी राखे , वणी उपविभाग अमृत मित्र श्री अमित उपाध्ये उमरखेड उपविभाग अमृत मित्र श्री गिरीशजी जोशी यांनी व्यक्त केला आहे. अधिक माहितीसाठी अमृतच्या जिल्हा कार्यालयात या क्रमांकावर- 9921625903संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

























