प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण असलेल्या दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात माजी आमदार बोदकुरवार म्हणाले की,
“प्रकाशाच्या या सणाने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आणि उत्तम आरोग्य लाभो.
प्रत्येक घरात आनंद, हास्य आणि समाधान नांदो.
दिव्यांच्या प्रकाशात नवीन उमेद, नवीन स्वप्न आणि नवचैतन्य फुलो.”
त्यांनी पुढे सांगितले की, “दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून, समाजात एकतेचा, आपुलकीचा आणि सौहार्दाचा संदेश देणारा पर्व आहे.”
सर्वांनी शांतता, प्रेम आणि सहकार्याचा प्रकाश समाजात पसरवावा, असे आवाहन त्यांनी केले.


























