भाजपमध्ये नाराजीचं नाट्य सुरूच???
वणीतील राजकीय चित्र
महायुती विरूद्ध महायुती…
(City Hub Media – वणी)
भाजपमधील नाराजीचं वादळ अजूनही ओसरलेलं नाही. माजी आमदार आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते विश्वास नांदेकर यांच्या संपर्कात आता भाजपमधील एक बडा ओबीसी नेता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे हा ओबीसी नेता शिवसेना बाळासाहेब ठाकरे (शिंदे गट) कडे वळू शकतो???
हा नेता ओबीसी मतांमध्ये प्रभावशाली असून, त्याचा स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार आहे.
असेच काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांनी नाराजी व्यक्त करत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशावेळी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, ज्यातून शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रभाव आणि वाढती ताकद स्पष्ट दिसून आली.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की —
👉 भाजपच्या गळातून अजून आणखी किती मासे निसटणार?
👉 नाराजीचं नाट्य थांबेल का?
👉 की येणाऱ्या निवडणुकीत भाजपला असंतुष्टांचा फटका बसेल का ?
जर अशीच नाराजीची साखळी सुरू राहिली, तर आगामी निवडणुकीत भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. पक्ष नेतृत्वाने आता निर्णायक भूमिका घेऊन असंतुष्टांना पुन्हा आपल्याकडे वळवणं हीच वेळेची गरज आहे — अन्यथा “फटका” अनिवार्य आहे!
📍सिटी हब मिडिया…

























