वणी शहरात घडलेल्या खळबळजनक स्वप्निल राऊत हत्याकांडाचा तपास वणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत उकलला होता. या प्रकरणातील दोन संशयितांना शनिवारी अटक करण्यात आली होती. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव स्वप्निल किशोर राऊत (वय २६, रा. रंगनाथ नगर, वणी) असे आहे.
तर पोलिस कोठडीतील संशयित आरोपींची नावे सुमेश रमेश टेकाम (२४) आणि सौरभ मारुती आत्राम (२७), दोघेही रा. वडजापूर (ता. वणी) अशी आहेत.
तपासानुसार, सुमेशचा मृतकाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होता. स्वप्निलकडून होणाऱ्या मारहाणीमुळे सुमेशने त्याच्यावर राग धरला होता. गुरुवारी दुपारी जत्रा मैदानावरून दारू पिण्याच्या बहाण्याने स्वप्निलला बाहेर बोलावण्यात आले. नंतर वरोरा रोडवरील गजानन नगरी परिसरात दोघांनी मिळून त्याचा दगडाने आणि धारदार वस्तूने खून केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले, मात्र पोलिसांनी २४ तासांच्या आत दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी रविवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

























