✨ “वैकुंठ चतुर्दशीला श्री रंगनाथ स्वामींचे दर्शन म्हणजे वैकुंठ धामाचे साक्षात दर्शन!” ✨
वणीतील श्री वैकुंठ महोत्सव २०२५ — भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा संगम!
🕉️ कार्तिक शुद्ध चतुर्दशी (वैकुंठ चतुर्दशी) निमित्त भव्य धार्मिक सोहळा – श्री रंगनाथ स्वामी देवस्थान, वणी येथे!
वैकुंठ चतुर्दशीच्या पवित्र दिवशी श्री रंगनाथ स्वामींच्या दर्शनाने वैकुंठ धामाचे साक्षात दर्शन घडणार आहे. यंदा मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य श्री वैकुंठ महोत्सव २०२५ उत्साहात साजरा होणार आहे.
या दिवशी सकाळी १० वाजेपासून श्री रंगनाथ स्वामींच्या मूर्तींवर महाअभिषेक व पूजा अर्चना होणार असून, दुपारी १ ते २ वाजता ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज (उपासनामंडळ, वणी) यांच्या द्वारे सामूहिक उपासना आयोजित केली आहे.
यानंतर दुपारी २ ते ४ वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. हा प्रसाद श्री विजय चोरडिया यांच्या सौजन्याने दिला जाणार आहे.
दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत विष्णुसहस्रनामावली पठण मनुमहाराज आणि त्यांच्या संचातर्फे सादर केली जाणार व भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार…
संध्याकाळी ७ ते ८ वाजता सामूहिक श्रीसूक्त हवन आयोजित आहे.
रात्री ८ वाजता शिवतांडव नृत्य श्री चेतन जोशी यांच्या समूहाकडून सादर केले जाईल,तसेच हरिहर मिलनाची सुंदर झाकी प्रस्तुत केली जाईल…
तर रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत दीपोत्सव, ब्रह्मोत्सव, छप्पन भोग, हरिहर मिलन, महाआरती होणार आहे.
या सोहळ्यासाठी प.पू. श्री गोविंद महाराज रूपनारायण जोशी (हिंगणघाट) आणि दक्षिण भारतीय वेदशास्त्र संपन्न पंडित वर्ग वाद्यवृंदासहित उपस्थित राहणार आहेत.
सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की, या पवित्र महोत्सवात सहभागी होऊन आपले जीवन धन्य करावे व प्रसादाचा लाभ घ्यावा.
📍 स्थळ: श्री रंगनाथ स्वामी देवस्थान दिनांक ४ नोव्हेंबर, २०२५ मंगळवार,सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत…

























