माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा आरोप – “आमदार संजय देरकर करत आहेत जनतेची दिशाभूल”
अडेगाव ते आमलोन (४ कोटी १४ लक्ष) तसेच खातोरा- येडत(२ कोटी १४ लक्ष)
येथील सिमेंट रस्त्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीबाबत राजकीय वाद रंगला आहे. या कामांसाठी एकूण ६ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मिळाल्याची घोषणा विद्यमान आमदार संजय देरकर यांनी केली असली तरी, हा निधी माजी आमदार संजिव रेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यकाळातच मंजूर झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
माजी आमदार बोदकुरवार यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा २” या योजनेअंतर्गत १८ जुलै २०२४ रोजी या कामांची मंजुरी मिळाली होती. परंतु, विद्यमान आमदार संजय देरकर हे या कामाचे श्रेय स्वतः घेत असून, जनतेची दिशाभूल करत आहेत.
बोदकुरवार म्हणाले, “संजय देरकर यांनी जर प्रत्यक्षात कोणते काम मंजूर करून आणले असेल तर त्याचे श्रेय घ्यावे, पण इतरांच्या मंजूर कामाचे श्रेय घेणे म्हणजे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.”
या आरोपामुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून, या निधीच्या मंजुरीवरून आरोप-प्रत्यारोपांचा नवीन फेरीला सुरुवात झाली आहे.
सिटी हब मीडिया…

























