Homeखेलनागपूर ओपन ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियनशिपमध्ये आर्थिका आणि आर्येश उपाध्ये यांचा सुवर्ण...

नागपूर ओपन ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियनशिपमध्ये आर्थिका आणि आर्येश उपाध्ये यांचा सुवर्ण विजय 🥇

-

[gtranslate]

Advertisementspot_img

घुग्गुसचा अभिमान,

नागपूर येथे २५ व २६ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या ओपन ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत घुग्घुस येथील “फिट टू फाईट अकॅडमी” (संचालक आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते सेन्सई श्री. विनय बोढे) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या कु. आर्थिका संजय उपाध्ये आणि तिचा भाऊ आर्येश संजय उपाध्ये यांनी आपापल्या गटात सुवर्ण पदक जिंकून घुग्घुस शहराचा गौरव वाढविला आहे.

या स्पर्धेत विदर्भातील तब्बल ३१७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तीव्र प्रतिस्पर्ध्यांमध्ये आर्थिका आणि आर्येश यांनी आपल्या दमदार खेळ, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.

स्थानिक नागरिक, शिक्षकवर्ग आणि क्रीडाप्रेमी वर्गाने या यशाबद्दल उपाध्ये भावंडांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

🏅 “आर्थिका आणि आर्येश यांचे यश हे घुग्घुससाठी तसेच नवोदित कराटे खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे,” असे अनेकांनी गौरवोद्गार काढले.

📸 City Hub Media

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए