Homeक्राइमवणीत ‘मॅकरून ॲकॅडमी’च्या शैक्षणिक कामकाजावर आक्षेप; एकाच UDISE वरून शाखा चालवल्याचा संशय,...

वणीत ‘मॅकरून ॲकॅडमी’च्या शैक्षणिक कामकाजावर आक्षेप; एकाच UDISE वरून शाखा चालवल्याचा संशय, ‘लढा संघटने’ची थेट चौकशीची मागणी!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

शहरातील नामांकित ‘मॅकरून स्टुडंट्स ॲकॅडमी अँड ज्युनिअर सायन्स कॉलेज’च्या कारभारावर गंभीर संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. संस्थेकडे असलेल्या एकाच UDISE नोंदणी क्रमांकाचा आधार घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीरपणे वर्ग भरवले जात असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला असून, शिक्षण विभागाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ‘ऑन-द-स्पॉट’ पंचनामा करावा, असा खणखणीत पवित्रा लढा संघटनेने घेतला आहे. संघटनेचे प्रवीण खानझोडे यांनी या प्रकरणी शिक्षण प्रशासनाला सविस्तर निवेदन देऊन तातडीने कारवाईचे निर्देश देण्याची विनंती केली आहे.

संस्थेच्या वडगाव मार्गावरील संकुलासाठी नोंदणीकृत असलेला UDISE क्रमांक इतरत्र चालणाऱ्या उपक्रमांसाठीही सर्रास वापरला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर केवळ टेबल रिपोर्टवर विश्वास न ठेवता जमिनीवर जाऊन प्रत्यक्ष खातरजमा करणे अत्यावश्यक बनले आहे.

तपासणीसाठी उपस्थित केलेले कळीचे मुद्दे:

कागदी अहवालांची सत्यता पडताळा: शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन वस्तुस्थिती तपासली आहे का, की केवळ कार्यालयात बसून सोयीस्कर अहवाल तयार केले गेले?

जागा बदलाचे नियम धाब्यावर?: संस्थेने स्थलांतर केले असल्यास जुन्या संकुलात अद्याप वर्ग सुरू ठेवण्यासाठी आवश्यक कायदेशीर मंजुरी घेतली आहे का?

परवानग्यांचा अभाव: विविध ठिकाणी सुरू असलेल्या शाखा आणि इमारतींसाठी नगर परिषद व शिक्षण खात्याची अधिकृत परवानगी आहे का?

शासकीय लाभांचा गैरवापर?: एकाच नोंदणी क्रमांकावर (UDISE) विविध ठिकाणची पटसंख्या एकत्र दाखवून शासनाकडून निधी, अनुदान किंवा अन्य सवलती लाटल्या गेल्या आहेत का?

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी आणि प्रशासकीय पारदर्शकतेशी निगडित हा संवेदनशील विषय असल्याने या गैरप्रकारांची पाळेमुळे खणून काढणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. चौकशीदरम्यान किंचितही अनियमितता किंवा फसवणूक निष्पन्न झाल्यास संस्थाचालकांसह दोषींवर थेट दंडात्मक व फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा इशारा देण्यात आला आहे.

सदर तक्रारीच्या प्रती प्राथमिक शिक्षण संचालक, अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक, यवतमाळ जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद प्रशासन, वणी नगर परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात   आल्या आहेत.

“हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि सरकारी नियमांच्या काटेकोर पालनाचा विषय आहे. अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री औपचारिक चौकशी न करता प्रत्यक्षात वर्ग कुठे, कसे आणि कोणाच्या मंजुरीने भरवले जात आहेत याचा पंचनामा करावा. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कायदेशीर बडगा उगारलाच पाहिजे.”— प्रवीण खानझोडे (लढा संघटना, वणी)

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए