अचानक समोर आली मोपेड आणी बस चढली डिवाईडर वर,अनेकांचा जीव आला होता संकटात…
- वणी वरून नागपूरला जाणाऱ्या धनश्री ट्रॅव्हल्सच्या बसचा लो.टि.महाविद्यावयाजवळ अपघात झाला आणि बस चढली डिवाईडर…

सकाळी जवळपास साडे आठ च्या सुमारास धनश्री ट्रॅव्हल्सची बस क्र.(MH40-AT0565) नागपूरला जायला निघाली व लो.टि.महाविद्यालयामोर अचानक एक मोपेडस्वार नाव कवडू गेडाम रहिवासी भीमनगर मोपेढ्ड क्र.(MH29-CA437) बस समोर आला यामुळे बस ड्रायव्हर ने जोरात ब्रेक दाबले व मोपेडला धडक बसून बस डिवाईडर वर चढली.
या अपघातामुळे मोपेडस्वार जखमी झाला असून बसच्या यात्रेकरूंना ही झटका लागला परंतु सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही व एक मोठा अपघात टळला…
काही वेळानंतर दुसऱ्या बसने यात्रेकरूंना नागपूरला रवाना करण्यात आले व जखमी मोपेडस्वारला दवाखान्यात दाखल करण्यात आले,पोलिसांना माहिती देण्यात आली असून या अपघाताची चर्चा सध्या गावात सुरू आहे…

























