Follow Us On

Sunday, July 6, 2025
spot_img

भाषा चुनें

More
    Homeअंतरराष्ट्रीययशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव वापरायचं की नाही याचं आत्मचिंतन करा, नाव न...

    यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव वापरायचं की नाही याचं आत्मचिंतन करा, नाव न घेता सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

    -

    Advertisementspot_img

    Supriya Sule : नुसता यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरुन उपयोग नसतो, तर त्यांचे विचार घेतले पाहिजेत असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा विचार चव्हाण साहेबांनी मांडला. त्यांनी कायम दुसऱ्याला सत्ता दिली माझ्यासोबत तुम्ही देखील सत्तेत राहा असे ते म्हणाले. दुर्दैव आहे पण आज तसं होताना आता दिसत नाही. निवडणूक लढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण चव्हाण साहेबांचं नाव वापरायचं की नाही याचा आत्मचिंतन करावं असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला. रात्री पीडीसीसी बँक उघडी कशी? याचे उत्तर मला पाहिजे. ही बँक कोणाची मक्तेदारी नाही असेही सुळे म्हणाल्या.

    इतकी चांगली बँक रात्री 11 वाजता उघडी का?

    इथलं सीसीटीव्ही फुटेज यंत्रणेंना मिळालं पाहिजे. तुम्हीच नियम करणार तुम्हीच नियम मोडले तर याला लोकशाही म्हणत नाहीत याला दडपशाही म्हणतात असे सुळे म्हणाल्या. आपली इतकी चांगली बँक आहे तर रात्री 11 वाजता बँक उघडी का? कोण तिथे गेलं होतं? माळेगावच्या सभासदांचा बँकेचा काय संबंध तुमच्या सगळ्यांची नाव तिथे होती माझेही असेल असे सुळे म्हणाल्या. या बँकेची एसआयटी कमिटी नेमा, पारदर्शक चौकशी करा अशी मागणी सुळे यांनी केली. मोदी म्हणतात बँकेचा व्यवहार पारदर्शक राहिला पाहिजे मग पीडीसीसी बँक मोदींच्या विरोधात का काम करते? याची चौकशी झाली पाहिजे. जर चौकशी झाली नाही तर मी पार्लमेंटमध्ये याची मागणी करणार असल्याचे सुळे म्हणाल्या. मी कोणावरही आरोप करत नाही असे सुळे म्हणाल्या.

     

    आपल्यापेक्षा ताकदवान व्यक्तीशी लढा, गरिबांशी लढून काय फायदा?

    अमिताभ बच्चनचा पिक्चर फ्लॉप जातो अमिताभ बच्चन काय घरात बसतो का? केंद्रातले आणि राज्यातले प्रश्न असतील ते सगळे आपण सोडवू असेही सुळे म्हणाल्या. बारामती फळविक्रेत्यांच्या फळांच्या टोपल्या सगळ्या फेकून दिल्या आहेत. बारामती सुंदर झाली पाहिजे परंतु जेवढा श्रीमंतांचा त्यामध्ये हात आहे तेवढाच गरीबांचा देखील हात आहे. हे चालणार नाही. नगर पालिकेला समान फेकून देण्याचा अधिकार नाही असेही सुळे म्हणाल्या. जर सर्वसामान्यांचे फेकून देत असाल तर पीडीसीसीमध्ये असं झालं का? लढायचं असेल तर आपल्यापेक्षा ताकदवान व्यक्तीशी लढा, गरिबांशी लढून काय फायदा? असा सवाल देखील सुळेंनी केला.

    आजपासून रात्र वैऱ्याची आहे

    आज आणि उद्या फक्त लक्ष ठेवा मोबाईलचा व्हिडिओ चालू ठेवा. कशाचंही दर्शन झालं तर त्याचं व्हिडिओ काढा. पांडुरंगाचेही दर्शन होऊ शकतं असे सुळे म्हणाल्या. आजपासून रात्र वैऱ्याची आहे. खरंच वैऱ्याची आहे. दरवाजा वाजेल लोक येतील जातील जो येईल त्याला नमस्कार करा आणि व्हिडिओ चालू ठेवा असेही सुळे म्हणाल्या. समता ही फक्त शिक्षणातून मिळते, बळीराजा सहकार बचाव पॅनलला संधी द्या हीच विनंती  करण्यातसाठी मी आले आहे असे सुळे म्हणाल्या. आज आणि उद्या फक्त कॅमेरे चालू ठेवा ही झोपायची वेळ नाही लढाईची वेळ आहे असेही सुळेम्हणाल्या.

    फक्त तुतारी लक्षात ठेवा, माणूस 24 तारखेला वाजवायला येईल : युगेंद्र पवार

    जे नवीन सभासद जोडले गेलेले आहेत ते शरद पवारांनी सूचना केल्यानंतरच जोडले गेलेले आहेत, तसे प्रोसेटिंग देखील त्या ठिकाणी आहे. मात्र, पुढच्या पॅनलची लोक काहीही सांगतात  असे म्हणत नाव न घेता युगेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. शरद पवारांचे सहकारात मोठे योगदान आहे. स्वतः चा एकही कारखाना ताई आणि साहेबांनी काढला नाही. सगळी सत्ता जर एकाच हातात गेली तर लोकशाहीसाठी ते घातक असतं. हे सगळे आपले संचालक उत्तम कारखाना चालू शकतील असे युगेंद्र पवार म्हणाले. आपलं चिन्ह तुतारी आहे, आता फक्त तुतारी लक्षात ठेवा, माणूस 24 तारखेला वाजवायला येईल असेही युगेंद्र पवार म्हणाले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराजा सहकार बचाव पॅनेलची सांगता सभा माळेगाव येथे होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडते आहे. यावेळी युगेंद्र पवार बोलत होते.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    चला विठू रूखमाईच्या दर्शनाला,आषाढी एकादशीला विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल
    02:56
    Video thumbnail
    वणी पुलिस ने शातिर अपराधी को किया तड़ीपार।
    01:32
    Video thumbnail
    जिनके कंधों पर जिम्मेदारीयों का बोझ होता है वो मौसम और हालातों की परवाह नहीं करते।
    00:19
    Video thumbnail
    पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वणी तर्फे बाजीराव वृद्धाश्रमात ब्लॅंकेट वाटप.
    03:34
    Video thumbnail
    आगामी निवडणुकीत भाजप युती नाही झाली तर स्वबळावर निवडणूक लढणार,प्रफुल्ल चौहान जिल्हाध्यक्षभाजप यवतमाळ
    02:53
    Video thumbnail
    सबके अच्छे स्वास्थ्य के लिए हर वर्ष महिलाएं निकालतीं हैं नंगे पैर कई किलोमीटर लंबी कलश यात्रा।
    07:14
    Video thumbnail
    मान्सून आणि भजे,#streetfoodindia #streetfood #foody #foodie
    01:01
    Video thumbnail
    केदारनाथ हेलीकॉप्टर दुर्घटना में मृत अपने शिष्यों को श्रद्धांजलि देने वणी पहुंचे पं.प्रदीप मिश्राजी।
    02:48
    Video thumbnail
    ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र बंद अवस्थेत, जनतेला बसतोय प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भुर्दंड...
    06:59
    Video thumbnail
    दहा महिन्यांनंतर न्यायाला सुरूवात पण कठोर कारवाई शिवाय न्याय अपुरा...
    05:12
    Video thumbnail
    मुलीचे आपत्तीजनक फोटो व विडिओ वायरल केल्यामुळे मुलीचे तुटले लग्न,प्रकरण गेले पोलिस स्टेशनमध्ये.
    01:25
    Video thumbnail
    दोन चिमुकल्यांची आई चुकीच्या उपचाराने दगावली, कुटुंबियांचा आरोप,सोनु लोडे ला न्याय कधी मिळेल???
    12:11
    Video thumbnail
    श्री महावीर बहुद्देशीय संस्थेचे वणी रेल्वे स्टेशन वर पाणी वाटपाचे काम प्रशंसनीय...
    01:17
    Video thumbnail
    सोशल मीडिया वरचा साधा माणूस, जीवनातही साधाच, विलास झट्टे शी एक खास मुलाखत...
    33:29
    Video thumbnail
    खतरों के खिलाड़ी।
    00:11
    Video thumbnail
    डमरू को ,दो वक्त का खाना खाने से पहले किचड खाना पडता हैं।
    00:14
    Video thumbnail
    चोर चुस्त, पुलिस सुस्त वणी में थम नहीं रही बाईक चोरी की घटनाएं।
    01:55
    Video thumbnail
    वटपौर्णिमेचे उखाणे...
    01:02
    Video thumbnail
    महिला का नग्न विडियो बनाकर महिला को किया ब्लैकमेल।
    01:30
    Video thumbnail
    समजून घ्या वटपौर्णिमेचे अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व, पूर्ण बघा हा विडिओ...
    02:40
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए