Iran Threat to Pakistan:एकीकडे इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरु असताना इराणनं पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. नवी दिल्लीतील इराणच्या उच्चायुक्त कार्यालयातील उप मिशन प्रमुख जावेद हुसैनी यांनी शुक्रवारी म्हटलं की या संघर्षात कोणताही तिसरा गट सहभागी झाल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. ते म्हणाले की पाकिस्तान आमच्यासोबत उभा राहील, असं देखील ते म्हणाले. इस्त्रायलला आज थांबवलं नाही तर आगामी काळात आणखी देशांना हल्ले सहन करावे लागतील, असं हुसैनी म्हणाले.
जावेद हुसैनी म्हणाले की इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आहे, तिसऱ्या देशाचा यात प्रवेश झाल्यास समस्या जटील होईल. आमच्याकडे काही अघोषित शक्ती आहेत, ज्या भविष्यासाठी सुरक्षित ठेवल्या आहेत. हुसैनी यांना पाकिस्तानचे सेना प्रमुख असीम मुनीर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लंच संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी ते म्हणाले की आम्ही इशारा देतोय की, जर कोणता तिसरा देश या युद्धात आला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
जावेद हुसैनी यांनी भारताच्या संदर्भात कोणतीही नाराजी नसल्याचं म्हटलं. इराणला भारताकडून भविष्यात चांगल्या सहकार्याची अपेक्षाची असल्याचं ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा एजन्सीकडून इस्त्रायलच्या इशाऱ्यावर काम केलं जात आहे. जी 7 मधील देश कायम इस्त्रायलची बाजू घेतात. इराणनं अणवस्त्र अप्रसार करारावर स्वाक्षरी केली आहे. मात्र, आम्ही विना अट आत्मसमर्पण करणार नाही असं ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर अनकंडिशनल सरेंडर असं लिहिलं होतं. याचं उत्तर देताना हुसैनी यांनी आम्ही विना अट आत्मसमर्पण करणार नसल्याचं म्हटलं.
ऑपरेशन सिंधू, इराणचं भारताला सहकार्य
भारतानं सुरु केलेल्या ऑपरेशन सिंधूला इराणकडून सहकार्य करण्याचा शब्द देण्यात आला आहे. या अभियानाद्वारे इराण- इस्त्रायल यांच्यातील संघर्षात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे भारतात आणलं जात आहे. इराणच्या महन एअरची तीन चार्टर्ड विमानं मशहद येथून दिल्लीकडे रवाना होणार आहेत. इराणमधील 10 हजार भारतीयांपैकी 1000 हजार भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात आणलं गेलं आहे. उर्वरित भारतीयांना परत आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे.