Ishan Kishan Joins Nottinghamshire : भारतीय क्रिकेट संघाकडून सातत्याने डावलले गेलेल्या इशान किशनने आता मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे.
Ishan Kishan joins County Championship : भारतीय क्रिकेट संघाकडून सातत्याने डावलले गेलेल्या इशान किशनने आता मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. त्याने 2023 मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याच वेळी, अलीकडेच त्याची इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या इंडिया अ संघात निवड झाली. परंतु इशानला या मालिकेतही खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत, इशान किशनने त्याच्या भविष्याकडे पाहता एक मोठा निर्णय घेतला आहे. इशान किशन लवकरच एका नवीन संघाकडून खेळताना दिसणार आहे.
इशान किशनने घेतला मोठा निर्णय
सध्या भारताच्या कसोटी संघात त्याला संधी मिळत नसल्याने, इशानला देशाबाहेर खेळून स्वतःचं पुनरागमन साधायचं आहे. काऊंटी क्रिकेटमधून अनेक भारतीय खेळाडूंनी आपला फॉर्म आणि आत्मविश्वास परत मिळवला आहे. आता इशान देखील त्याच वाटेवर आहे.
नॉटिंगहॅमशायर संघासोबत दोन सामन्याची केली डील
आक्रमक फलंदाजी आणि शानदार विकेटकीपिंगसाठी ओळखला जाणारा इशान किशन नॉटिंगहॅमशायरकडून दोन काउंटी चॅम्पियनशिप सामने खेळणार आहे. हे सामने 22 जून रोजी ट्रेंट ब्रिज येथे यॉर्कशायर विरुद्ध आणि 29 जून रोजी टॉंटन येथे सोमरसेट विरुद्ध होतील. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने इशानने हा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला पसंती देण्यात आली, त्यानंतर इशानने काउंटी क्रिकेटद्वारे त्याचे रेड-बॉल क्रिकेट आणखी चांगले करण्याचा निर्णय घेतला आहे.
नॉटिंगहॅमशायरमध्ये सामील होताना इशान किशन म्हणाला, ‘इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याची पहिली संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे, माझे कौशल्य दाखवण्याची ही एक उत्तम संधी असेल. मी सर्वोत्तम क्रिकेटपटू बनू इच्छितो आणि इंग्रजी परिस्थितीत खेळल्याने मला खरोखरच नवीन कौशल्ये शिकण्यास मदत होईल.’