चिखलगाव येथे रामनगर वार्डाजवळ आज रात्री एक धावती कार अचानक पेट घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार रस्त्यावरून जात असताना अचानक आग लागली. क्षणात गाडीने पेट घेतला आणि धुराचे प्रचंड लोट उठू लागले. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. लोकांनी दुरून व्हिडिओ आणि फोटो काढले, कारण गाडीमध्ये स्फोट होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू होती.
फायर ब्रिगेडच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. आग लागण्याचे कारण शॉर्टसर्किट असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट करण्यात येईल…

























