Homeखेलक्रिष्णा मास्टर्स अकॅडमी चा सातवा वर्धापन दिन साजरा व रामानुजन इन ट्रान्स...

क्रिष्णा मास्टर्स अकॅडमी चा सातवा वर्धापन दिन साजरा व रामानुजन इन ट्रान्स एक्झामचं पारितोषिक सोहळा संपन्न!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी शहरातील नामांकित कृष्णा मास्टर्स अकॅडमी येथे शैक्षणिक, सामाजिक व प्रेरणादायी वातावरणात अकॅडमीचा ७ वा स्थापना दिवस तसेच रामानुजन इंटेलिजन्स टेस्टच्या पारितोषिक वितरणाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात अकॅडमीचे संस्थापक व संचालक प्रा. निलेश निवलकर सर यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाली. आपल्या मनोगतात त्यांनी गेल्या सात वर्षांतील अकॅडमीच्या शैक्षणिक प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. JEE, NEET, ११ वी–१२ वी बोर्ड तसेच MHT-CET या परीक्षांमध्ये मागील तीन वर्षांत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा आढावा सादर करत गुणवत्ताधिष्ठित शिक्षणावर अकॅडमीचा ठाम भर असल्याचे स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना त्यांनी “उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः” हा संस्कृत श्लोक उद्धृत करत परिश्रम, शिस्त आणि मूल्याधारित शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला.

याच प्रसंगी दि. १४ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या रामानुजन इंटेलिजन्स टेस्टमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ दि. १ जानेवारी रोजी बाजोरिया लॉन येथे पार पडला. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करणे व गणित विषयाची आवड निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रा. निवलकर सरांनी सांगितले. सामाजिक उपक्रमाच्या स्वरूपात राबवण्यात येणाऱ्या या परीक्षेमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या परीक्षेतील विजेते पुढीलप्रमाणे —

प्रथम: तनुश्री बारीक,

द्वितीय: यश्वी बत्रा,

तृतीय: अक्षद शेंडे,

चतुर्थ: आचल सूर्यवंशी,

पंचम: स्मिथ झाडे,

षष्ठ: सिद्धी बजाईत,

सप्तम: शैलेश बोधेकर,

अष्टम: ओजस दहिवलकर,

नवम: स्वरा भगत,

दशम: अनुष्का गोहाने.

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला पालक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वर्धापन दिनानिमित्त अकॅडमीच्या सहनिर्देशक शुभम मदान तसेच हेमंत जुमडे, वैभव दयेकर, श्रीराम माने, वैभव बावणे, सचिन भेंडाळे, प्रशांत आसेकर व इतर शिक्षकवृंद यांच्या योगदानाबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

कृष्णा मास्टर्स अकॅडमीच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही अशा प्रेरणादायी उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए