Follow Us On

Sunday, February 15, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeखेलवणीच्या जत्रोत्सवात कुस्तीचा महासंग्राम, महिला व पुरुष गटात दंगल कुस्तीचा थरार रंगणार...

    वणीच्या जत्रोत्सवात कुस्तीचा महासंग्राम, महिला व पुरुष गटात दंगल कुस्तीचा थरार रंगणार…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    १६ वर्षांनंतर वणीत दंगल कुस्तीचा जल्लोष,

    महिला व पुरुष गटात ‘माजी आमदार केसरी दंगल कुस्ती’**

    वणी शहराची सांस्कृतिक व क्रीडापर परंपरा जपणाऱ्या श्री रंगनाथ स्वामी यात्रोत्सवानिमित्त यावर्षी खेळप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी असून, तब्बल १६ वर्षांनंतर भव्य दंगल कुस्तीचे आयोजन करण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. यावर्षी ही दंगल कुस्ती महिला व पुरुष अशा दोन्ही गटांत भरविण्यात येणार असून, त्यामुळे कुस्तीप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

    शनिवारी (७ फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजता श्री रंगनाथ स्वामी मंदिरात झालेल्या बैठकीत यावर्षी दंगल कुस्त्या भरविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या दंगल कुस्त्या माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार पुरस्कृत ‘माजी आमदार केसरी दंगल कुस्ती’ या नावाने आयोजित करण्यात येणार आहेत.

    या दंगल कुस्त्यांसाठी पैलवान पांडुरंग लांजेवार यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या या प्रयत्नाला कुस्तीप्रेमी, पैलवान व विविध सामाजिक घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष बाब म्हणजे, यंदा महिला गटातील दंगल कुस्त्यांनाही स्वतंत्र व मानाचे व्यासपीठ देण्यात येणार असल्याने महिलांच्या क्रीडाशक्तीला चालना मिळणार आहे.

    दरम्यान, पुरुष गटातील विजेत्या पैलवानास पारंपरिक ‘गदा’ बक्षीस म्हणून प्रदान करण्यात येणार असून, त्यामुळे दंगल कुस्ती अधिक रंगतदार व स्पर्धात्मक ठरण्याची शक्यता आहे.

    दंगल कुस्त्यांची नेमकी तारीख व आयोजनस्थळ अद्याप निश्चित करण्यात आले नसून, याबाबतचा अंतिम निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

    या बैठकीस पांडुरंग लांजेवार, सुरेंद्र ईखारे, प्रमोद निकुरे, फारुख रंगरेज, इरफान शेख, शेख अकील, अशोक निकुरे, मोरेश्वर बरडे, विठ्ठल चौधरी, बंडु निंदेकर, बाबुलाल पोटदुखे, जहिर शेख, दिलीप खाडे, संतोष जोशी, सूर्यकांत मोरे, जॉन पोन्नलवार, अजय बोबडे, विजय थेरे, रमेश शर्मा, प्रा. दिलीप मालेकर, सुरेश रायपुरे, संदीप जयस्वाल, रमेश बावणे, कनैया पारखी, रमेश येरणे, दिपक पचारे, सुदामा सादवानी, परशुराम पोटे, महादेव दोडके यांच्यासह मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी व मान्यवर उपस्थित होते.

    महिला व पुरुष दोन्ही गटांत होणाऱ्या या दंगल कुस्त्यांमुळे वणीतील कुस्ती परंपरेला नवी ऊर्जा मिळणार असून, यंदाचा यात्रोत्सव खेळप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Video thumbnail
    गावातील लोकं शिवलिंगावर कपडे धुवत होती मग काय घडलं,बघा या विडियो मध्ये...
    08:54
    Video thumbnail
    भालर येथील शेतकरी व रॉकवेल मिनरल्स कंपनी आमनेसामने,कंपनीच्या प्रदूषणामुळे नुकसान भरपाई ची मागणी...
    13:01
    Video thumbnail
    स्पेशल झुनका भाकर.#food #foodie ##strrefoods #indianfood #foodlover
    02:00
    Video thumbnail
    फिर याद आया वो गुजरा जमाना, वो भी क्या दिन थे।
    19:21
    Video thumbnail
    नगरपालिका के बगल में शौचालय,लेकिन नागरिक खुले में जाने को मजबूर।
    01:59
    Video thumbnail
    हरिपाठ करत निघाली वरात...
    01:00
    Video thumbnail
    बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी किरण नांदेकर यांची राजकारणात एंट्री...
    02:39
    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए